Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी शहरात शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : पालकमंत्री विखे

अहिल्यानगर दि.२८-राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षेसाठी दोन वर्षे मुदतवाढ
महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर रिक्षा

अहिल्यानगर दि.२८-राहुरी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नागरिकांनी शांतता राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सभोवती असलेल्या अतिक्रमणाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

 राहुरी येथे दोन दिवसांपुर्वीच्या  घटनेनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तहसिल कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले,जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गी,पोलीस उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील,  तहसिलदार नामदेव पाटील आदी उपस्थित होते. बैठकीनंतर मंत्री विखे पाटील यांनी राहुरी तालुक्यातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांच्या समवेत बैठक घेवून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 

 मंत्री विखे पाटील म्हणाले, राहुरी येथील घटनेचा तपास पोलीस योग्यदिशेने करीत आहेत. त्यांना थोडा कालावधी अजून द्यावा लागेल. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून त्याचा आपणही तीव्र शब्दात निषेध करतो. अशा घटना घडविणारे कोण आहेत याचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहेत.तपासातील नेमकी माहिती त्यांच्यापर्यत आली असली तरी त्यांना अधिक वेळ देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. समाजिक एकोपा कायम राखून या शहराचा नावलौकीक उंचावण्याची जबाबदारी सर्वानी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. घटनेनंतर आपण जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात राहून सातत्याने माहिती घेत होतो. प्रशासनाने योग्य भूमिका घेवून परीस्थिती नियंत्रणात ठेवली.दोन दिवस राहुरी तालुक्यातील जनता, कार्यकर्ते यांनी दाखवलेला संयम खूप महत्वपूर्ण असल्याचा उल्लेख करून त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांनी दोन दिवसात चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळली, असेही पालकमंत्री म्हणाले.

COMMENTS