Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी मिळावी

एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे मागणी

कोपरगाव - कोपरगाव तालुक्यातील ज्या गावात आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे अशा गावात शासनाने आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उ

मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
कोपरगाव शहरातील शिबिरात 135 रुग्णांची तपासणी
महिलेचा पाठलाग करून गैरवर्तन, गुन्हा दाखल

कोपरगाव – कोपरगाव तालुक्यातील ज्या गावात आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे अशा गावात शासनाने आदिवासी बांधवांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा सुमित्राताई पवार व कार्याध्यक्ष ड. सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांना निवेदन देत केली आहे. सदर निवेदन देते प्रसंगी एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पवार, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्‍वर पिंपळे, कोपरगाव तालुका संपर्कप्रमुख दिपक पवार, सतीश भांगरे, अजय बर्डे, नितीन जाधव, आकाश मोरे, सचिन सोनवणे आदि एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावात मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचे वास्तव्य असून या कुटुंबात जर कोणी मयत झाले तर आमच्या रितीरिवाजाप्रमाणे त्या मयत व्यक्तीस जमिनीत दफन करावे लागते. परंतु अनेक गावात स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने मोठी पंचायत आमच्या समाजाची होत असून मयत झाल्यानंतर जागा शोधण्यात वेळ जात असल्याने त्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात वणवण होत असते. त्यामुळे शासनाने कोपरगाव तालुक्यातील ज्या गावात आदिवासी समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे अशा गावात स्वतंत्र स्मशानभूमी करिता किंवा एक एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने शासनाला कोपरगाव चे तहसीलदार यांना निवेदन देत केली आहे.

COMMENTS