Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा

प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा

श्रीरामपूर ः भारतीय जवान राष्ट्राप्रती देत असलेले समर्पण, त्याग, शौर्य आणि बलिदान यामुळेच देश सुरक्षित आणि समृध्द बनला आहे. भारतीय सीमांवर सैनिक

शिवरायांचा पुतळा पुन्हा बसवण्याची मागणी
महिलेच्या खुनाचा प्रयत्न करणार्‍यास सक्तमजुरी
पिंपळनेर येथे ग्रामपंचायतीच्या वतीने गुणवंतांचा सम्मान

श्रीरामपूर ः भारतीय जवान राष्ट्राप्रती देत असलेले समर्पण, त्याग, शौर्य आणि बलिदान यामुळेच देश सुरक्षित आणि समृध्द बनला आहे. भारतीय सीमांवर सैनिक अहोरात्र डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करीत आहे. त्यामुळेच शत्रु राष्ट्रांवर भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने जवानांप्रती आदरभाव जोपासावा, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले यांनी केले.
श्रीरामपूर तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिनानिमित्त अमर जवान स्मारक येथे आयोजित एक दिया शहीदोंके नाम या शहीद जवानांना अभिवादन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्रा. गवले बोलत होते. तालुका पोलिस संघटनेचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलिस अधिकारी संजय भोंडवे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, ईनरव्हिल क्लबच्या अध्यक्षा डॉ. शितल घोगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमानिमित्त सकाळी शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात बोरावके महाविद्यालयातील 57 महाराष्ट्रीय बटालियन एन. सी. सी. चे 60 विद्यार्थी, तालुक्यातील आजी माजी सैनिक व शहरातील नागरिक सहभागी झाले होते. मेजर सुनील देवकर यांनी यांनी शहिदांना पुष्पचक्र अर्पण करुन रॅलीचे विसर्जन झाले. सायंकाळी सर्वश्री संजय भोंडवे, प्रा. ज्ञानेश गवले व दिपक मेढे यांच्या हस्ते शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करुन तसेच स्मारकासमोर  दिवा लाऊन सामुहिक मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी संजय भोंडवे, दिपक मेढे, डॉ. शितल घोगरे यांनी आपल्या मनोगतातुन जवानांच्या समर्पणाची महती सांगितली. या प्रसंगी सर्वश्री गोरक्षनाथ साब्दे, आर. पी. शिंदे, चांगदेव मोरे, किशोर भोसले, विलासराव पाटील, उल्हासराव धुमाळ, ईनरव्हील क्लबच्या सुनीता धुमाळ, शितल कुंदे, पुनम गांधी, मायाताई दैमिवाळ, तालुका सैनिक संघटनेचे अनिल लगड, अनिल सिन्नरकर, राजु शिंदे, मेजर कांदे, कॅप्टन उघडे, घनश्याम निसळ, वाणी, संजय बनकर, अस्लम शेख, तोडमल, भगवान गुंजाळ, बाळासाहेब लांडे, जिल्हा तलाठी महासंघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब कदम, उद्योजक बाळासाहेब भवार, निवृत्त महसुल अधिकारी अशोकराव गाढे, बाळासाहेब ढोकचौळे, अनिल तायडे,श्रीमती लांडे,राशीनकर, कोठुळे, गोरे,सोनवणे, गणेश सोडणार, सुनील काळे आदींसह तालुक्यातील आजी माजी सैनिक उपस्थित होते. तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब उंडे पा. यांनी उपस्थितांचे स्वागत, प्रास्ताविक व कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. तर शेवटी अनिल लगड यांनी आभार मानले.

COMMENTS