श्रीरामपूर ः घरातील लहानांपासून थोरापर्यंत सर्व कुटुंब ग्रंथप्रेमी झाले पाहिजे, ज्ञानशील कुटुंब होण्यासाठी प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर, घरात, मो
श्रीरामपूर ः घरातील लहानांपासून थोरापर्यंत सर्व कुटुंब ग्रंथप्रेमी झाले पाहिजे, ज्ञानशील कुटुंब होण्यासाठी प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर, घरात, मोठे वाचनालय असले पाहिजे असे मत डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गावोगावी, घरोघरी पुस्तक वाचनालय व्हावे म्हणून वाचन संस्कृती प्रबोधन ग्रंथवाचन, प्रसार, प्रचार आणि मोफत पुस्तक वितरण उपकम आयोजित करते, त्यातील एक उपक्रम कडा येथील वाहन चालक मालक संघटना संघर्ष ग्रुपचे राज्य सरचिटणीस सुभाषराव देशमुख व त्यांचे सहकारी आणि कुटुंब यांना ग्रंथ वाचनालयासाठी पुस्तके भेट देण्यात आली, त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. यावेळी संघर्ष ग्रुपचे राज्य सरचिटणीस सुभाषराव देशमुख यांनी स्वागत, सत्कार करून डॉ. उपाध्ये यांच्या ग्रंथसंस्कृती प्रसार कार्याचे कौतुक केले. त्याअगोदरही डॉ. उपाध्ये यांनी हजारो पुस्तके भेट म्हणून दिली असून ती पुस्तके विविध गावात, ग्रंथालयांनाना दिली असल्याची माहिती देशमुख यांनी दिली. डॉ. उपाध्ये यांनी देशमुख परिवाराने ग्रंथ चळवळीसाठी खूप सहकार्य केले, करीत असल्याबद्दल कौतुक केले. यावेळी श्रीमती सोनाबाई देशमुख, अनिता देशमुख, मंदाकिनी उपाध्ये, आरती उपाध्ये, प्रसाद देशमुख, दत्तात्रय देशमुख, गणेशानंद उपाध्ये, प्रतीक्षा देशमुख आदीसह सहकारी उपस्थित होते. आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर प्रसाद देशमुख यांनी आभार मानले.
COMMENTS