Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातून दररोज 70 मुली बेपत्ता

रूपाली चाकणकर यांची माहिती तीन महिन्यात पाच हजारांहून अधिक मुली हरवल्या

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्यातून दररोज विविध शहरातून आणि ग्रामीण भागातून मुलींना पळवल्याची, अपहरणाच्या घटना समोर येत आहे. मात्र याचा नेमका

बाबा माफ करा, मी तुमचं स्वप्न… |
‘एमआयएम’ आणि आघाडीचा अन्वयार्थ
दोन दिवसात दाखला देण्याचा पाटण तहसिलदारांचा अभिनव उपक्रम

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्यातून दररोज विविध शहरातून आणि ग्रामीण भागातून मुलींना पळवल्याची, अपहरणाच्या घटना समोर येत आहे. मात्र याचा नेमका आकडा किती असा प्रश्‍न होता. राज्यातून दररोज सरासरी 70 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती सोमवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.
ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यामध्ये फक्त अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. त्या मुलींची ओळख जाहीर केली जात नाही. 18 वर्षांवरील मुली आणि महिलांचाही या यादीत समावेश आहे. प्रेम प्रकरण, लग्नाचे आमीष, नोकरीचे आमीष या सगळ्याला बळी पडून बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार सुद्धा केले जातात. ही बाब अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे यासंदर्भात गृह विभागाने लवकरात लवकर पाऊल उचलावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे. चाकणकर यांनी दिलेल्या माहितीवरुन मार्च महिन्यात राज्यातून 2200  मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्या आधी फेब्रुवारी महिन्यात ही संख्या 1810 इतकी होती. त्यामुळे एकाच महिन्यात बेपत्ता होणार्‍या मुलींच्या संख्येत 390 ने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हरवलेल्या व्यक्तींची विभाग मुंबई यांच्याकडून आम्ही माहिती घेत असतो. त्यांच्याकडून अहवाल मागवत असतो. प्रत्येक राजकारणार्‍याकडे मिसिंग सेल आहे. तो कार्यरत आहे की नाही? असा सवालही चाकणकर यांनी उपस्थित केला आहे. मुली बेपत्ता होण्याच्या घटनेबाबत सुप्रिया सुळे यांनी देखील ट्विट केले आहे. हा विषय अतिशय गंभीर असून गृह तसेच महिला व कुटुंब कल्याण विभागाने एकत्र येऊन याबाबत तातडीने काम करण्याची आवश्यकता आहे, असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. त्या म्हणाल्या, महाराष्ट्रासह देशात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. मुलींची दिशाभूल करुन त्यांचे अपहरण करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या बेपत्ता मुलींचे पुढे काय होते हा प्रश्‍न शासनाला पडत नाही का? पडत असेल तर त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय स्तरावर काही होत आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

बेपत्ता होण्याच्या संख्येत महाराष्ट्र अव्वल –जानेवारी ते मार्च 2023 या तीन महिन्यात महाराष्ट्रातून 5 हजार 510 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कायदा  सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातून 1600 मुली बेपत्ता झाल्या, फेब्रुवारी महिन्यात 1810 तर एप्रिल महिन्यात 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिवसेंदिवस बेपत्ता होणार्‍या मुली आणि महिलांची संख्या वाढते आहे हे आपल्यासाठी चिंताजनक आहे. यामध्ये 2020 पासून हरवलेल्या व्यक्तींबाबत दुर्दैवाने पहिल्या क्रमांकावर आहे, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.


अहमदनगरमधून 101 मुली बेपत्ता – शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. पुणे, नाशिक, अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे. मार्च महिन्याची आकडेवारी पाहता, पुण्यातून 2258 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर नाशिकमधून 161, कोल्हापूर 114, ठाणे 133, अहमदनगर 101, जळगाव 81 तर सांगलीतून 82 मुली बेपत्ता झाल्या आहेत.

COMMENTS