Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आकाशवाणीचे सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू

15 ऑगस्टपासून श्रोत्यांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवाणी

अहमदनगर ः गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सांयकालीन प्रसारण पुन्हा 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महा

कर्जत नगरपंचायतीने शहर विकास आराखडा न बनवताच खर्च केले कोट्यावधी
शिर्डीत एक दिवसीय सौंदर्य स्पर्धा व कार्यशाळेचे आयोजन ः जयश्री रोहमारे
नियमित पिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान द्या – आ. आशुतोष काळे

अहमदनगर ः गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेले आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे सांयकालीन प्रसारण पुन्हा 15 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. आकाशवाणी महानिर्देशनालय दिल्ली आणि अप्पर महानिर्देशनालय मुंबई यांनी नुकतीच यासाठी परवानगी दिल्याची माहिती आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे प्रमुख राजेंद्र दासरी यांनी दिली आहे.
आकाशवाणी अहमदनगर केंद्राची स्थापना 14 एप्रिल 1991 मध्ये झाली असून, तेव्हापासून विविध कार्यक्रमांद्वारे या केंद्राने श्रोत्यांचे मनोरंजन केले आहे. श्रोत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या या केंद्राचे सायंकालीन प्रसारण बंद झाल्यामुळे स्थानिक कलाकार आणि श्रोते नाराज होते. तसेच सायंकालीन प्रसारणात स्थानिक कार्यक्रमाऐवजी मुंबई विविधभारतीचे कार्यक्रम सहक्षेपित होत होते.
त्यामुळे स्थानिक कलाकार, विचारवंत, तसेच आकाशवाणीचे नैमित्तिक उद्घोषक यांना मिळणार्‍या संधी कमी झाल्या होत्या. आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रमविभागप्रमुख राजेंद्र दासरी यांनी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सायंकालीन प्रसारणास मंजूरी मिळून 15 ऑगस्ट 2024 पासूनप पूर्वीप्रमाणेच सायंकालीन प्रसारण पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे आता अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील श्रोत्यांना लोकसंगीत, नारीशक्ती, चला करूया पर्यटन, कौटुंबिक श्रुतिका, विचारमंथन, लोकजागर, व्यक्तीवेध, आपली आवड आपकी पसंद, ओळख कायद्याची, हॅलो गीतबहार, सुहाना सफर, रजनीगंधा, हॅलो डॉक्टर, युवावाणी इत्यादी लोकप्रिय कार्यक्रमांची मेजवाणी श्रोत्यांना मिळणार आहे.

आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीने सायंकाळचे स्थानिक प्रसारण सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला होता. त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर यश मिळाले असून, 15 ऑगस्टपासून आकाशवाणी अहमदनगर केंद्रावर सायंकाळचे स्थानिक प्रसारण आम्ही पुन्हा सुरू करणार आहोत, यामुळे स्थानिक कलाकारांना प्राधान्य मिळण्यास मदत होणार आहे.
राजेंद्र दासरी, कार्यक्रमप्रमुख, आकाशवाणी, अहमदनगर

COMMENTS