Homeताज्या बातम्यासंपादकीय

तिसरी फेरीतही भाजप आघाडीचा संकोच !

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचे मतदान काल संध्याकाळी आटोपले. त्यानंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रद

मृत्यूचे तांडव आणि आरोग्य व्यवस्था !
शपथविधीसह आघाडी सरकारांचा काळ सुरू !
ओबीसी तरूणांना प्रशिक्षित करू !

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचे मतदान काल संध्याकाळी आटोपले. त्यानंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश हे तीन राज्य सोडली तर, उर्वरित सर्व राज्यांमध्ये मतदान हे मोठ्या प्रमाणात झाले. सर्वाधिक मतदान हे आसाम राज्यात झाले असून, त्यांची टक्केवारी जवळजवळ ७४.९३ टक्के एवढी आहे; तर, त्या खालोखाल ७३.९४ टक्के एवढ्या प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये मतदान झाले. त्यानंतर जवळपास सर्वच राज्यांची आकडेवारी ही चांगली म्हणावी, अशीच आहे. गोव्यातही ७२% च्या वर मतदान झाले. तर, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही मतदान हे चांगल्या प्रकारे झाले. अनुक्रमे ६६ आणि ६२ टक्के झाले. एकंदरीत तिसऱ्या फेरीतील मतदानामध्ये ९४ जागांचा समावेश होता. मात्र, त्यातील सुरत येथील लोकसभा निवडणूक, या आधीच बिनविरोध झाल्यामुळे, खऱ्या अर्थाने ९३ जागांसाठी मतदान झाले. ज्या ९३ जागांसाठी काल मतदान झाले, त्यापैकी भारतीय जनता पक्षाकडे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनुसार ८० जागा आहेत. मात्र, या निवडणुकीत, त्या ऐंशीपैकी त्यांच्या २० जागा कमी होतील, असा अंदाज काही राजकीय तज्ञांनी लावलेला आहे. मात्र, यावर जवळपास सर्व तज्ञांचा दुजोरा मिळालेला आहे. अर्थात, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत जे २८४ जागांसाठी आता मतदान झाले, ही आकडेवारी म्हणजे लोकसभेच्या एकूण जागांपैकी निम्मे आकडेवारी म्हटल्यास, ते वावगे ठरणार नाही; किंबहुना, ती निम्म्यापेक्षा जास्त आहे! एकंदरीत, लोकसभा निवडणुकीचे अजूनही चार फेज बाकी असले तरी, ते आता विरळ अशा मतदारसंघांचा तो भाग आहे. अर्थात, काऊ बेल्ट मध्ये अजून बऱ्याच जागी लढत होणार आहे! परंतु, आता बहुमताचा जो आकडा आहे, म्हणजे तज्ञांच्या अंदाजानुसार, सत्ताधारी पक्षाला धक्का देणारा आहे. तिसऱ्या फेरीमध्ये नेमकी सत्तेत कोणती आघाडी येईल, याविषयी एक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, तिसऱ्या फेरीपर्यंत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत ज्याप्रमाणे भाजपाची पिछाडी झाल्याचा अंदाज, राजकीय विश्लेषक वर्तवित आहेत; तिच गत तिसऱ्या फेरीतही झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे! जर, विश्लेषकांचे हे म्हणणे खरे असेल तर, मग भारतीय जनता पक्षाला किंबहुना एनडीए आघाडीला सरकार बनवण्याइतपत बहुमत मिळवण्यासाठी कठीण जाईल,

असा एकंदरीत सूर दिसतो. अर्थात, इंडिया आघाडी या ९४ जागांपैकी जर २० जागा अधिक मिळवण्यात यशस्वी ठरत असेल तर, निश्चितपणे सत्तेच्या दिशेने त्यांची आघाडी ही सुरू होईल; असे या तिसऱ्या फेरीच्या मतदानानंतर म्हणता येईल! सर्वत्र जे काही संकेत दिसत आहेत, तिसऱ्या फेरीपर्यंत निवडणुकीतून जो मतदारांचा एकूण कल दिसतो आहे, जी मानसिकता दिसते आहे, ती मानसिकता बऱ्याच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची जशी आहे, तशी राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मात्र निराशेची आहे! अर्थात, या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होण्याचं कारण राजकीय विश्लेषक खास करून जे देत आहेत, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची मतदानाची टक्केवारी कमी झाली असल्याचा विश्लेषकांचा अंदाज आहे! त्यानुसार भारतीय जनता पक्षाला सत्तास्थानी येण्यासाठी कठीण परिस्थिती निर्माण झाल्याचाही एकंदरीत सूर दिसतो. महाराष्ट्रात तिसऱ्या फेरीच्या मतदानासोबत अजून फक्त दोन फेऱ्या बाकी आहेत.  सर्वात शेवटच्या फेरीमध्ये मुंबईच्या सहा जागांवर लढत होत आहे. उर्वरित महाराष्ट्र झाल्यानंतर सर्व नेते मुंबईत एकवटणार. मुंबईतील राजकीय शक्ती ही खऱ्या अर्थाने सेना आणि काँग्रेस यांच्यामध्येच असेल. अर्थात काँग्रेस एक असली तरी सेनेचे मात्र दोन भाग झाले आहेत. त्या दोन भागांपैकी नेमक्या कोणत्या गटाला मतदार अधिक प्राधान्य देतात, हे २० तारखेच्या मतदानाच्या कलावरून निश्चितपणे दिसून येईल. अर्थात, सर्वच निकाल अंतिमतः ४ जूनला लागतील. परंतु, या निवडणुकीत राजकीय निरीक्षक किंवा विश्लेषक हे मोठ्या प्रमाणात जो अंदाज वर्तवता आहेत, त्या अंदाजानुसार जवळपास सर्वच क्षेत्रातील तज्ञ कार्यकर्ते आणि प्रत्यक्षात मतदार देखील दुजोरा देताना दिसतात.

COMMENTS