Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नदीला पूर तरी कोपरगावाकरांना 8 दिवसाआड पाणी

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केली खंत

कोपरगाव शहर ः धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने कोपरगाव शहरापासून वाहणारी गोदावरी नदी धोक्याची पातळीत वाहत आहे परंतु नदी किनारी वस

व्यापार्‍यांनी केला आ. आशुतोष काळेंचा सत्कार
Sangamner : थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
15 हजारांचा गंडा घालणार्‍या भोंदूविरुद्ध कर्जत पोलिसात गुन्हा

कोपरगाव शहर ः धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने कोपरगाव शहरापासून वाहणारी गोदावरी नदी धोक्याची पातळीत वाहत आहे परंतु नदी किनारी वसलेल्या कोपरगाव शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याची खंत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नाही हे कारण सांगून  13 ते 14  दिवसाआड पाणीपुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने केला. परंतु आता गोदावरी नदीला या पावसाळ्यातला दुसरा पूर आलाय, तर कालवे देखील भरभरून वाहत आहे. तरीसुद्धा नगरपालिका जनतेला 4 दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत करून देत नाही. जनतेला का वेठीस धरले जाते.जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत 4 दिवसाआड का करत नाही. शहरातील महिलांची पाण्यासाठीची तारांबळ , पाणी दिवस कमी करून नगरपालिका प्रशासन कधी थांबवणार. असा सवाल पाटील यांनी उपस्थित करत पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ज्यामुळे शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊन हाल होतात. पाणी साठवून ठेवण्यासाठी झोपडपट्टी भागात लोक पातेल्यांमध्ये, घागरी मध्ये पाणी साचवतात आणि दुसरीकडे नगरपालिका सांगती की पाणी साठवून ठेवू नका डेंग्यूचे डास तयार होतात आणि दुसर्‍या बाजूला नगरपालिका पाणी दिवस कमी करायचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही. एकीकडे खूप डासांचा त्रास आणि दुसरीकडे 8 दिवसात पाणी पुरवठा करत जणू शहर वासियाच्या  जीवाशी खेळण्याचे काम प्रशासन करत असल्याने ही नक्कीच खेदाची बाब असून नगरपालिकेला पूर्ण पाणीपट्टी भरून देखील सुद्धा नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी पिण्यासाठी नगरपालिका का देत नाही असा सवाल करत याचा खुलासा नगरपालिकेने केला पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष पाटील यांनी करत नगरपालिका प्रशासनाने त्वरीत शहर वासीयांना 4 दिवसाआड पाणी पुरवठा करत त्याचे वेळापत्रक वार्ड नुसार जाहीर करावे अशी विनंती केली आहे.

सुधारणेची गरज – नगरपालिकेच्या फिल्टरेशन प्लांटला इंडस्ट्रीची एक्सप्रेस फीडर लाईन असून देखील पाण्याची टाकी भरली नाही. या नावाखाली किती तास वेळेवर पाणी न सोडता महिलांना ताटकळत ठेवतात.त्यामुळे यात देखील सुधारणा होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी व्यक्त केले.

COMMENTS