Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मितीला आर्थिक सहाय्य द्यावे

बिपीनदादा कोल्हे यांची केंद्र सरकारकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना निर्

वनपरिक्षेत्रच्या कार्यालयाची अवस्था स्थलांतरित बिबट्यासारखीच ः नितीन शिंदे
कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोर्‍यात आणू : जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा विश्‍वास
नगर मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक

कोपरगाव प्रतिनिधी ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाला आर्थिकस्थैर्य प्राप्त होण्यासाठी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना निर्देश देवुन त्याबाबतचे धोरण आखून सुमारे दहा हजार कोटी रूपये आयकर माफ केला ही बाब स्वागतार्ह असून साखर धंद्याला आणखी बळकटी येण्यांसाठी केंद्र शासनाने साखर निर्यातीऐवजी इथेनॉल निर्मितीला जास्तीचे आर्थिक सहाय्य द्यावे जेणेकरून आपल्या देशात कच्च्या तेलाची आयात थांबवून परकीय चलनात मोठया प्रमाणांत बचत होईल अशी मागणी संजीवनी उद्योग समुहाने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी संचालिका सोनिया व बाळासाहेब दत्तात्रय पानगव्हाणे या उभयतांच्या हस्ते विधीवत पूजन झाली. त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
            प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेवुन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने दैनंदिन गाळप क्षमतेत आधुनिकीकरणासह संगणकीकरणाला प्राधान्य देत सुधारणा करून मार्गक्रमण सुरू ठेवले असून संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, युवा अध्यक्ष विवेक कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे  संकल्पनेतुन उसतोडणी यंत्रे व ड्रोन खरेदीसाठी कारखान्यामार्फत प्रोत्साहनपर अनुदान, पेपरलेस कार्यालयीन कामकाजासाठी संगणकीकरण, उस उत्पादकता वाढ व खोडवा उस पीक व्यवस्थापक यासाठी विभागीय मेळावे, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन, एसएसआरडी कोईमतूर यांचे सौजन्याने शेतकर्‍यांच्या बांधावर मार्गदर्शन तसेच आर्थिक शिस्त व गतीमान प्रशासकीय कामकाज, प्रशासकीय शिस्त, विना अपघात कारखाना कामकाज, उस उत्पादक शेतकर्‍यांसह कामगारांचे हित, सर्व संगणकीकरण कामकाज या पंचसुत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचा मनोदय कार्यकारी संचालक बाजीराव जी सुतार यांनी शेवटी व्यक्त केला. उपाध्यक्ष रमेश घोडेराव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, एच आर मॅनेजर प्रदिप गुरव, सचिव विधिज्ञ तुळशीराम कानवडे आदींनी उपस्थितांचे स्वागत केले. कोल्हे यावेळी बोलतांना म्हणाले की, बिबटयासह हिंस्र प्राण्यांचा प्रार्दुभाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या सुरक्षीततेसाठी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाने केंद्र व राज्य शासनाच्या सर्व परवानग्या घेवुन राज्यात सर्वप्रथम ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पीकावर किटकनाशक फवारणी कार्यक्रम माफक दरात शेतक-यांच्या बांधापर्यंत उपलब्ध करून दिला आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा. या कार्यक्रमांस संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, ज्येष्ठ नेते  दत्तात्रय कोल्हे, संचालक बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, मनेष गाडे, विलासराव वाबळे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्‍वर परजणे, त्रंबकराव सरोदे, विलासराव माळी, यादवराव संवत्सरकर, कैलास संवत्सरकर, रामदास शिंदे, राजेंद्र सोनवणे, रविंद्र पाठक, स्वप्नील निखाडे, सुनिल वाणी यांच्यासह विविध क्षेत्रातीलमान्यवर आजी माजी संचालक, उस उत्पादक सभासद शेतकरी, उसतोडणी वाहतुकदार, कंत्राटदार मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

कोल्हे कारखाना उस बेणे मळयात 6 हजार जाती विकसित – कोल्हे कारखाना उस बेणे मळयात 6 हजार विकसित जाती माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कमी पाण्यात दर्जेदार बेण्यात उसाचे उत्पादन वाढविण्यावर भर दिला. तोच आदर्श ठेवून सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांच्या उस बेणे मळ्यात 6 हजार विकसित उस जाती असून त्याचा देश विदेशात प्रसार सुरू असल्याचे बिपीनदादा कोल्हे यांनी सांगितले.

COMMENTS