Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांसाठी मतदार सुलभता केंद्रांची स्थापना

अहमदनगर ः भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदार सुलभता

आनंदऋषीजी हॉस्पिटलने आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला ः आरिफ शेख
गाडीला कट मारून तिघांकडून दोघांना मारहाण, एकास पकडले
शेवटी महिलाच उतरल्या राखेसाठी रस्त्यावर l पहा LokNews24

अहमदनगर ः भारत निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असलेल्या मतदारांना मतदान करण्यासाठी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदार सुलभता केंद्र स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार 37-अहमदनगर लोकसभा मतदार संघातील 222- शेवगाव, 223-राहुरी, 224- पारनेर 225-अहमदनगर शहर, 226-श्रीगोंदा व 227-कर्जत-जामखेड या सहा विधानसभा मतदार संघात मतदार सुलभता केंद्रांची व्यवस्था प्रशिक्षणाच्या ठिकाणी करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांनी  त्यांच्या प्रशिक्षणाच्या दिवशी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क मतदार सुलभता केंद्रावर जाऊन बजवावा. असे आवाहन 37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे  निवडणूक निर्णय अधिकारी  यांनी केले आहे.

COMMENTS