Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांसाठी तक्रार निवारण केंद्राची स्थापना  

खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे सुक्ष्म नियोजन

अहमदनगर/प्रतिनिधी ः खरीप हंगाम सन 2023-24 साठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने स

जागर वाचनाचा उपक्रमामुळे वाचन चळवळ बळकट
महिलांच्या आरोग्यावर संपुर्ण कुटुंबाचे आरोग्य निर्भर -संतोष माणकेश्‍वर
संगमनेरमध्ये नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार

अहमदनगर/प्रतिनिधी ः खरीप हंगाम सन 2023-24 साठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषि विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले असून, जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करणेत आलेली असून या कक्षाची जबाबदारी गजानन घुले, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक, मोबाईल क्रमांक 9404324196 व अमृत गांगर्ड मोहीम अधिकारी, जिल्हा परिषद मोबाईल क्रमांक 7588178842 यांचेकडे सोपविणेत आलेली आहे.
 तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करणेत आलेली आहे. प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करणेत आलेली आहेत. जिल्हयामधील शेतक-यानी निविष्ठा उपलब्धतेमध्ये काही अडचणी उदभवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा.
            शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर 1 व प्रत्येक तालुका स्तरावर 1 अशी एकुण 15 भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करणेत आलेली असून, भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस निविष्ठा व जादा दराने निविष्ठांची विक्री केल्यास संबधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शेतक-यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणा-या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल. किटकनाशके किवा तननाशके खरेदी करताना त्यांची अंतीम मुदत तपासून घ्यावी. अधिकृत विक्री केंद्रांमधूनच खते खरेदी करावीत. फिरत्या वाहनामधून खताची विक्री होत असल्यास त्वरीत वरील क्रमांकाशी संपर्क करून तसे कळवावे. तसेच कोणताही विक्रेता निविष्ठा खरेदी करताना ईतर निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करत असल्यास तात्काळ जवळचे कृषि कार्यालयामध्ये तक्रार दाखल करावी. जिल्हयामधील निविष्ठा विक्रेत्याना देखील सूचीत करणेत येते कि, खरीप हंगामामध्ये गुणनियंत्रण विभागामार्फत बिक्री केंद्राची अचानक तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद असणा-या निविष्ठाचे नमुने तपासणीसाठी काढले जाणार आहेत. खताचा ई पीस साठा व प्रत्यक्षातील साठा तपासला जाणार आहे. तरी निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या बोगस निविष्ठांची विक्री करु नये. कोणतेही शेतकर्‍यांच्या हितास बाधा आणणारे बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही, अशा बाबी निदर्शनास आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे कृषी विभागाने कळविले आहे. जिल्हयामध्ये सर्व प्रकारच्या निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. कोणत्याही शेतक याने याबाबत घाबरुन जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास शेतक-यांनी आपल्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी वरील मोबाईल क्रमांकावर किंवा कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील 0241-2353693 किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील 0241-2430792 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

COMMENTS