Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोर्शे कार अपघातातील लाडोबाने लिहिला निबंध

पुणे ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघातप्रकरणी तब्बल 42 दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीने रस्ता अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहून बाल न्याय मंडळाकड

अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यासाठी बालविकास प्रकल्पवर मोर्चा
पुण्यात 200 झोपड्यांवर रेल्वेचा हातोडा
भिडेंविरोधात एफआरआयसाठी विलंब का ?

पुणे ः पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघातप्रकरणी तब्बल 42 दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीने रस्ता अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहून बाल न्याय मंडळाकडे सादर केला आहे. 18-19 मे च्या रात्री झालेल्या अपघातानंतर बाल मंडळाने 300 शब्दांचा निबंध लिहिण्यासह एकूण 7 अटींवर आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र, पोलिसांची मागणी आणि लोकांच्या संतापानंतर ज्युवेनाईल बोर्डाने आपल्या निर्णयात सुधारणा करत बदल केला होता. 22 मे रोजी बोर्डाने आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. मात्र, 25 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर करताना मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले होते की, बाल मंडळाच्या आदेशातील सर्व अटी आरोपींना लागू राहतील. बालगृहातून बाहेर पडल्यानंतर अल्पवयीन मुलाने 3 जुलै रोजी निबंध लिहिण्याची अट पूर्ण केली. अल्पवयीन आरोपी हा उर्वरित अटीही पूर्ण करणार आहे. यामध्ये मनोवैज्ञानिक समुपदेशन आणि वाहतूक नियम समजून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात काम करणे यांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्युवेनाईल बोर्डाच्या आदेशानुसार अल्पवयीन ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून मानसशास्त्रीय समुपदेशन घेत आहे. त्याच्या मावशीने ससून हॉस्पिटलशी संपर्क साधला होता. रुग्णालय प्रशासनाने यासंदर्भात बाल मंडळाकडून सूचना मागवल्या होत्या. अल्पवयीन मुलीच्या वकिलाने ससून हॉस्पिटलला निर्देश देण्यासाठी जुवेनाईल बोर्डात अर्ज दाखल केला आहे. आरटीओशीही संपर्क साधला आहे. जुवेनाईल बोर्डाने आरटीओ अधिकार्‍यांना अल्पवयीन मुलांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. अल्पवयीन आरोपी आरटीओ कार्यालयात वाहतूक नियमांचा अभ्यास करून 15 दिवसांत जुवेनाईल बोर्डाला अहवाल सादर करतील. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात 18-19 मे च्या रात्री 17 वर्षे 8 महिने वयाच्या अल्पवयीन आरोपीने बाईकवरून जाणार्‍या एका तरुण आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलाला धडक दिली, परिणामी दोघांचा मृत्यू झाला होता. घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत होता. तो ताशी 200 किलोमीटर वेगाने कार चालवत होता. अपघातानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले होते, मात्र बाल न्याय मंडळाने त्याला 15 तासांनंतरच जामीन मंजूर केला. जामीन अटींचा भाग म्हणून, त्याला रस्ते अपघातांवर 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास, काही दिवस वाहतूक पोलिसांसोबत काम करण्यास आणि प्रत्येकी 7,500 रुपयांचे दोन जामीन बॉन्ड भरण्यास सांगण्यात आले होते. 

COMMENTS