Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिकमध्ये साथीचे आजार

लाल डोळे, घसा खवखवनाऱ्याची संख्या अधिक

नाशिक प्रतिनिधी - शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी थंडगार पेय घेताना आता नागरिकांना विचार करावा लागणार आहे. त्याला कारण म्हणजे शहरात घशाच्या आजारा

चांदवड तालुक्यात आत्तापर्यंत 30 पॉझिटिव्ह रुग्णांचा शिरकाव | LOKNews24
तैवान कडून भारताला दिवाळीची मोठ गिफ्ट
राहुरी बस स्थानकाच्या इमारतीचा प्रश्‍न तात्काळ सोडवा

नाशिक प्रतिनिधी – शरीरात गारवा निर्माण करण्यासाठी थंडगार पेय घेताना आता नागरिकांना विचार करावा लागणार आहे. त्याला कारण म्हणजे शहरात घशाच्या आजारांच्या रुग्णांत वाढ होत आहे. तसेच, वाढत्या उष्म्यामुळे डोळे लाल होत असल्याने विषाणूजन्य आजाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पहिल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण होईपर्यंत या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे।

४०.७ पर्यंत तापमान पोचल्याने नाशिककरांच्या जिवाची लाहीलाही झाली. उष्णतेचा पारा कायम कमी अधिक राहिला. उष्णतेच्या लहरीपणामुळे यंदा अधिक झळ सहन करावी लागली. पावसाचे दिवस जवळ येत असताना नाशिककरांना वेगळ्याच आजाराने घेरले. सध्या थंडगार पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. थंड पदार्थ सेवन करणाऱ्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक आहे. थंड पदार्थ फ्रीजमध्ये किंवा बर्फात थंड करून ग्राहकांना दिले जातात. त्यात पुन्हा बर्फ टाकला जातो. कुठल्या पाण्यापासून बर्फ तयार केला जातो याची मोजदाद करता येत नाही, परंतु घसा खवखवण्याचे प्रमाण वाढल्याने वापरला जात असलेला बर्फ चांगल्या प्रतिचा नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. विशेष करून झोपडपट्टी भागात घसा खवखवणे व डोळे येण्याच्या आजाराचा सामना करावा लागते आहे. महापालिकेकडे अशा रुग्णांची नोंद नसली तरी खासगी रुग्णालयात व मेडीकल मधून परस्पर औषधे घेऊन उपचार घेतले जात आहेत।

झोपडपट्टी भागात अधिक रुग्णझोपडपट्टी भागात डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. विषाणूजन्य आजार असला तरी सध्या डोळे लाल होण्याचा जो त्रास होत आहे.त्याला वाढती उष्णता हे एक कारण सांगितले जात आहे. उष्णतेमुळे डोळे लाल होत असल्याचा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आला आहे. झोपडपट्टी भागात उष्णतेचे परिणाम अधिक दिसून येतात.लग्न, धार्मिक समारंभात गर्दीलग्न, धार्मिक समारंभानिमित्त नागरिक एकत्र येतात. घसा खवखवणे व डोळे येणे यासारखे विषाणूजन्य आजाराचा प्रसार येथूनच मोठ्या प्रमाणात होत असल्याने गर्दी न करण्याचे किंवा संरक्षणात्मक उपाय योजण्याचे आवाहन करण्यात आले आहे।

“घसा खवखवण्याचे आजार बर्फापासून होत आहे. तर डोळे लाल होण्याचे प्रकार वाढत्या उष्णतेचे आहे. या आजारांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार असले तरी रुग्ण येत नाही. घरच्याघरी औषधे घेऊन बरे होतात.”

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

COMMENTS