Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात पर्यावरण पूरक गणेश विसर्जन

गणेशभक्तांचा उदंड प्रतिसाद ; ध्वनी प्रदूषण रोखण्यास पोलिसांना अपयश

देवळाली प्रवरा  ः नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण पुरक गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन करण्यासाठ

कोल्हे सहकारी साखर कारखाना कामगार पतपेढीला 46 लाखाचा नफा
रस्सीखेच रंगली…अखेरच्या क्षणी भोसलेंचे नाव झाले अंतिम ; अन्य दोन इच्छुकांना व्हावे लागले सूचक-अनुमोदक
श्रीगोंदा तालुका योग संघाच्या अध्यक्षपदी गोविंद हिरवे

देवळाली प्रवरा  ः नगर पालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत पर्यावरण पुरक गणेश विसर्जन व निर्माल्य संकलन करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करुन दिल्याने राहुरी तालुक्यातील  गणेशभक्तांनी उदंड प्रतिसाद दिला. गणेशभक्तांनी नगर पालिकेने उभारलेल्या संकल केंद्रावर विधिवत पुजा करुन गणेशमुर्ती संकलन दिल्या.माञ ध्वनी प्रदुषण रोखण्यास पोलिसांना अपयश आले आहे.तालुक्यात ध्वनी प्रदुषणाची मर्यादा ओलंडण्यात आली. शहरात डिजेच्या ध्वनी कंपामुळे अनेक ठिकाणी घरांच्या खिडक्यांच्या तर काही दुकानाच्या  कांचाना तडे गेले आहेत.ध्वनी प्रदुषण रोखण्यात राहुरी पोलिसांना अपयश आले आहे.ध्वनी प्रदुषणावरुन  कोणत्याही डिजे चालका विरुद्ध कारवाई केली नसल्याने ञासलेल्या वृद्धांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली.
               गणेशाचे आगमन झाल्यानंतर तरुणामध्ये नवचैतन्य संचारले जाते.यावर्षी अकरा दिवसाचे दिवसाचा गणेशत्सव साजरा करण्यात आला.अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमा बरोबर समाजहिताचे कार्यक्रम सादर करण्यात आले.राहुरी पोलिस वसाहती मधील गणेश विसर्जन राहुरी तालुक्याच्या इतिहासात प्रथमच टाळ मृदंगाच्या गजरात व जयहरीच्या नामाचा जय घोष करत लाडक्या गणरायाची विसर्जन मिरवणूक पारंपारिक पद्धतीने काढण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वसाहती मधील गणेश मंडळाची गणपती विसर्जन मिरवणूक नवव्या दिवशी सायंकाळी काढण्यात येऊन तालुक्यातील गणेशभक्तां समोर एक आर्दश ठेवला. परंतु गणेश मंडळांनी डिजे मुक्त विसर्जन मिरवणूक साजरी करण्याऐवजी जास्त आवाजाचे डिजेच्या लावण्यात आले होते.तालुक्यात बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांनी माञ बघ्याची भुमिका घेतली.गणेश विसर्जनाच्या दुसर्‍या दिवशी दुपार पर्यंत कोणत्याही डिजे चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. राहुरी व देवळाली प्रवरा येथिल नगर पालिकेने पर्यावरण पुरक गणपती विसर्जन व निर्मल्य संकलन केंद्र उभारण्यात आले होते.या संकलन केंद्रास गणेशभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.देवळाली प्रवरा व राहुरी फँक्टरी येथिल संकलन केंद्रावर 1 हजार 300 गणेश मुर्तींचे संकलन झाले होते.राहुरीत 2 ते 3 हजाराच्या आसपास गणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले.या सर्व मुर्तींचे नगर पालिकेने पाण्याच्या टाकीवर एका हौदात अमोनियम बायकार्बोनेट पावडर वापरुन गणेशमुर्ती विसर्ञन करण्यात आले.देवळाली प्रवरा नगर पालिकेत राहाता नगर पालिकेने 300 ते 350 गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गणेशभक्तांकडून पर्यावरण पुरक गणेश विसर्जनास प्रतिसाद मिळाल्याने मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS