देवळाली प्रवरा ः मराठा सर्व्हेक्षणाची मंगळवार पासुन सुरवात करण्यात आली असली. सर्व्हेक्षणासाठी वापरले जाणारे अँप चालूच होत नसल्याने प्रगणकांना मनस
देवळाली प्रवरा ः मराठा सर्व्हेक्षणाची मंगळवार पासुन सुरवात करण्यात आली असली. सर्व्हेक्षणासाठी वापरले जाणारे अँप चालूच होत नसल्याने प्रगणकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या सर्व्हेक्षणातून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कोंडी झाली असुन अँप चालत नसल्याने सर्व्हेक्षणाचे काम होईना, ना शाळेत विद्यार्थ्यांना शिकविता येईना शिक्षक माञ अँप चालू होण्यासाठी हाता घडी तोंडावर बोट ठेवून वाट पाहत आहे. अनेक शिक्षकांच्या प्रगणक म्हणून झालेली निवड वशिल्याने रद्द केल्याने त्यांच्या जागी नविन नेमलेल्या शिक्षकांना सर्व्हेक्षणाचा ताप सहन करावा लागत आहे.
शासनाने जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा, नगर पालिका, ग्रामपंचायत कर्मचारी या विभागातील कर्मचार्यांची प्रगणक म्हणून नियुक्ती केलेली आहे.जिल्हा परिषद शाळेतील बहुतांशी शिक्षक सर्व्हेक्षण कामासाठी नियुक्ती झाल्याने विद्यार्थ्यांसह शाळा वार्यावर सोडावी लागली आहे. प्रगणकांना मंगळवार पासुन सर्व्हेक्षणास सुरवात झाली.ज्या प्रगणकाची नोंदणी त्याच प्रगणकाचे अँप चालू झाले आहे. ज्या प्रगणकांच्या वशिलेवर प्रगणक आँर्डर रद्द करुन दुसर्या प्रगणकास दिली आहे.त्या प्रगणकांचे अँप चालू झालेच नाही. नविन प्रगणकाचा नंबर नोदणी होत नसल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. विशेषतः देवळाली प्रवरा व राहुरी नगर पालिका या भागात हा प्रकार घडला आहे. त्यात अँप मध्ये देवळाली प्रवरा व राहुरी नगर पालिका क्षेत्राचा उल्लेख नसल्याने प्रगणकांना सदरील अँप मध्ये माहितीच भरता येत नसल्याचे समोर आले आहे.नोंदणी केलेल्या प्रगणकाच्या जागेवर दुसर्या प्रगणकाची नियुक्ती केल्याने त्या प्रगणकाची नोंदणीच झाली नसल्याने अँप चालूच होत नाही.त्यामुळे प्रगणकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मराठा सर्व्हेक्षणाच्या अँप मध्ये ग्रामिण भागातील सर्व गावांचा उल्लेख केला आहे. नगर पालिका क्षेञातील गावांचा उल्लेख नसल्याने तेथिल प्रगणकांना सर्व्हेक्षण करताच येईना. अँप उघडल्या नंतर प्रथम गावाचा उल्लेख करावा लागत आहे. नगर पालिका क्षेञातील गावांचा नोंदणी नसल्याने अँप मध्ये पुढील माहिती घेतली जात नसल्याने प्रगणकांचे हाथ बांधले आहेत. मराठा सर्व्हेक्षण करण्यासाठी ज्या प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली. परंतू वशिले बाजी करुन काही प्रगणकांनी नियुक्ती रद्द करुन घेतली अशाच ठिकाणी नविन प्रगणकांना अडचणीचे ठरत आहे.ज्या अधिकार्यांने प्रगणकांच्या नियुक्ती रद्द करुन दिल्या त्या अधिकार्यांची चौकशी केली जाणार का? आसा प्रश्न प्रगणकांमधुन केला जात आहे.
COMMENTS