मेढा / प्रतिनिधी : सहकारातील राजकारणाच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठेची कुठंतरी गळचेपी होत आहे. सहकारात वाहून घेतलेल्या प्रा

मेढा / प्रतिनिधी : सहकारातील राजकारणाच्या प्रवेशाने कार्यकर्त्यांचा प्रामाणिकपणा, निष्ठेची कुठंतरी गळचेपी होत आहे. सहकारात वाहून घेतलेल्या प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची आज समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले.
जावळी तालुक्यातील रांजणी-घोटेघर विकास सोसायटीचे सचिव गोपाळराव बेलोशे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी जावळीचे सहाय्यक निबंधक सुनील जगताप, कल्याणराव भोसले, माथाडीचे सरचिटणीस विठ्ठल गोळे, माजी सभापती रवी परामणे, प्रतापगड कारखाना संचालक राजेंद्र शिंदे, प्रदीप शिंदे, जावळी बँक संचालक योगेश गोळे, बाळासाहेब भालेघरे, तालुका अध्यक्ष सुरेश पार्टे, संदीप पवार, दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, बुवासाहेब पिसाळ, धरणग्रस्तांचे नेते तुकाराम घाडगे, संजय बेलोशे, हेन्री जोसेफ, अंकुश मालुसरे, रामदास पार्टे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रारंभी रांजणी-घोटेघर सोसायटी, सचिव संघटना, ग्रामस्थांच्या वतीने गोपाळ बेलोशे यांचा सेवानिवृत्तीबद्दल भव्य असा सत्कार केला.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जावळीच्या सहकारात गोपाळ बेलोशे यांचे योगदान मोलाचे आहे. भविष्यात त्यांनी सहकार क्षेत्रात मार्गदर्शनाच्या भूमिकेत राहून सहकाराला बळकटी देण्याचे काम करावे. यापूर्वी आपण जसे त्यांच्या पाठीशी होतो त्याच पध्दतीने आणखी बळ देण्यासाठी आम्ही कटिबध्द राहू, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS