Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छावा क्रांतिवीर सेनेमध्ये संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रवेश 

नाशिक प्रतिनिधी - नाशिक जिल्हा व शहरातील अनेक तरुणांनी आज विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख संदीप फडोळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील मध्यवर्ती

छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी तात्काळ मंत्री पदाचा व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा- करण गायकर 
शिर्डी येथे होणाऱ्या अधिवेशनाला नाशिक जिल्ह्यातून हजारो छावाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार- करण गायकर
नाफेड व एन सी सी एफ माध्यमातून चालू असलेली शेतकऱ्यांची फसवणूक त्वरित थांबवून दोषींवर कडक कारवाई करावी- करण गायकर

नाशिक प्रतिनिधी – नाशिक जिल्हा व शहरातील अनेक तरुणांनी आज विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख संदीप फडोळ यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात छावा क्रांतिवीर सेनेत प्रवेश केला.या सर्व तरुणांचं संघटन बघून यांच्यावर विद्यार्थी आघाडीमध्ये अनेक पदांची जबाबदारी देण्यात आली त्यामध्ये.विद्यार्थी आघाडी उपजिल्हाप्रमुख पदी श्रीकांत घाटोळ,जिल्हा संपर्कप्रमुख पदी सचिन नवले,शहर विद्यार्थी आघाडी महानगर प्रमुख पदी समाधान सानप, उपाध्यक्षपदी उदय घाडगे,शहर कार्याध्यक्ष सागर फडोळ,शहर संपर्कप्रमुख विशाल पाटील,सरचिटणीस नाशिक शहर सुरज फडोळ प्रसिद्धीप्रमुख कार्तिक काकड कोषाध्यक्ष शुभम फुल पगार यांची वरील पदांवर निवड करण्यात आली असून या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी सांगितले की सध्या शैक्षणिक विभागात अनेक समस्या आहेत.शिक्षणाचा काळाबाजार करून अनेक संस्था विद्यार्थ्यांना वेठीस धरतात अनेक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात डोनेशन व वाढीव मनमानी फी आकारून विद्यार्थी व पालकांचे शोषण केल्या जाते यासाठी तुम्ही सर्व तरुण पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे प्रत्येक कॉलेजला जाऊन संघटनेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे आणि तुम्ही निश्चितपणे या सगळ्या गोष्टींवर काम कराल अशी मला खात्री आहे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त सभासद संघटनेच्या शाखा कशा करता येईल याकडे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन प्रयत्न करणे गरजेचे आहेत।

जिल्हाप्रमुख संदीप फडोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज ज्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे ते पदाधिकारी त्या काळामध्ये जास्तीत जास्त सभासद त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजवर छावा क्रांतिवीर विद्यार्थी सेनेची शाखा करण्याचे नियोजन करण्यात आले असून लवकरात लवकर शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यात येईल निश्चितपणे तुम्ही आमच्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा आम्ही सर्व पदाधिकारी प्रयत्न करू तसेच आमच्याकडून संघटनेला काही अडचण निर्माण होईल असे कुठलेही कृत्य आमच्याकडून घडणार नाही याची तुम्हाला आम्ही ग्वाही देतो.असे संदीप फडोळ यांनी सांगीतले 

COMMENTS