Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योजक अजित सुरपुरिया यांचे निधन

पहाटे त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला.त्यातच त्यांचे निधन झाले.

अकोले प्रतिनिधी : अकोले येथील उद्योजक,जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक अजित सिमरतमल सुरपुरीया(Ajit Simratmal Surpuria) (वय-57)यांचे आज शुक्रवारी पहाटे  पु

मुंबईत जाऊन ओढणार अंगावर आसूड…; पोतराज संघटना झाली आक्रमक, कार्यक्रमांना परवानगीची मागणी
वारीतील रोकडोबाबा यात्रा चाळीस वर्षानंतर उत्साहात साजरी
श्रीरामपूरची ‘वाचन संस्कृती’जीवनमूल्ये जोपासणारी : डॉ.अनंता सूर

अकोले प्रतिनिधी : अकोले येथील उद्योजक,जनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक अजित सिमरतमल सुरपुरीया(Ajit Simratmal Surpuria) (वय-57)यांचे आज शुक्रवारी पहाटे  पुणे येथे रुबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.त्यांच्या पश्‍चात पत्नी,एक मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणी सदस्या कल्पनाताई सुरुपुरीया यांचे ते पती होते तर युवा उद्योजक तुषार सुरपुरीया व कोमल मनिष चोपडा यांचे ते वडील होत. हिंद सेवा मंडळाचे उपाध्यक्ष संजय चोपडा यांचे ते व्याही होते. 5 सप्टेंबर रोजी ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला होता. तर संगमनेर येथे त्यांचेवर उपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ त्यांना पुणे येथे हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर बाय पास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारत असतानाच गुरुवारी पहाटे त्यांना ह्रदय विकाराचा तीव्र झटका आला.त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी प्रवरातीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

COMMENTS