Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराडच्या प्रशासकीय इमारतीत कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांना प्रवेश बंद

कराड / प्रतिनिधी : कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्

महावितरणच्या अथक प्रयत्नांना यश; कृषिपंपांना 8 तास सुरळीत वीजपुरवठा
गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला भीषण अपघात; बसमधील चालकासह सहाजण जखमी
प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?

कराड / प्रतिनिधी : कोरोनानंतर ओमिक्रॉनच्या नवीन संसर्गाचा विचार करुन जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल, व्यावसायिक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून कराड येथील प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयात करण्यात आली. तिथे अनेकांनी दोन डोस न घेतल्याने त्यांना काम न होता रिकाम्या हाताने परतावे लागले.
कराड तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेलचे चालक-मालक, व्यावसायिक, मॉलचे चालक यांची बैठक प्रांताधिकारी उत्तम दिघे आणि तहसीलदार विजय पवार यांनी घेतली होती. त्यामध्ये पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरचे मुख्याधिकारी, बांधकाम, महावितरण, उत्पादन शुल्क विभागासह सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी, प्रतिनिधींच्या उपस्थितीत आदेश देण्यात आले होते.
त्यामध्ये पालिका, ग्रामपंचायत, पंचायत समितीने शासकीय, निमशासकीय कार्यालये, हॉटेल, व्यावसायिक, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे या ठिकाणी दोन लसीचे डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येईल. याची जनजागृती घंटागाड्यांच्या माध्यमातून करावी. या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी महसूल विभाग, पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी, पालिका, स्थानिक स्वराज्य संस्था संबंधित प्रशासकीय विभागांनी करावी, अशा सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून प्रशासकीय इमारतीमध्ये प्रवेश घेण्यासाठी करण्यात आली. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, मेसेज दाखवल्यानंतर आत सोडण्यात येत होते. त्यामुळे ज्यांनी दोन डोस घेतले नाहीत, त्यांची पंचाईत झाली.

COMMENTS