अकोले ः कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा , पिंपळदरी यांच्या वतीन
अकोले ः कर्मवीर भाऊराव पाटील जयंती निमित्त रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल व कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा , पिंपळदरी यांच्या वतीने व रोटरी नेत्र रुग्णालय, संगमनेर यांच्या सहकार्याने पिंपळदरी येथे परिसरातील नागरिकांचे मोफत नेत्र( डोळे) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये 110 नागरिकांनी लाभ घेतला. त्यापैकी 25 नागरिकांना डोळे शस्त्रक्रिया करण्यास सांगितले असून 4 नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. तर आश्रमशाळेतील मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली.
तर अर्पण ब्लड बँक संगमनेर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.तसेच उपस्थित 110 महिला व पुरुष यांची रक्तगट मधुमेह तपासणी करण्यात आली. तर आश्रमशाळेतील 100 मुलींचे हिमोग्लोबिन तपासणी व रक्तगट करण्यात आली.यावेळी रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी जागरूक रहाण्याचे आवाहन केले.यावेळी रोटरी क्लब अकोलेचे माजी अध्यक्ष सचिन शेटे, अमोल वैद्य व सदस्य निलेश देशमुख तर रोटरी आय केअर हॉस्पिटलचे डॉ. संस्कार पाटील,संदीप घुले व बाळासाहेब देशमुख तर अर्पण ब्लड बँकेचे गणेश झोडगे व त्यांची टीम पिंपळदरी गावच्या सरपंच सुनीताताई मांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सचिन रंधे, बाबासाहेब मांडे, गणपत मांडे, माजी सरपंच श्रीरंग कडाळे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष चांगदेव रंधे, आकाश रंधे, संपत मांडे, हरिचंद्र रंधे, नामदेव मांडे, रावसाहेब फटांगरे, यमुना रंधे, सुनील मांडे इत्यादी ग्रामस्थ तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मलाव, सुनील शेळके, राधेश्याम जगधने, अशोक कोरके तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सहाणे यांनी केले तर आभार सुनील शेळके यांनी मानले. यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
COMMENTS