Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यानिकेतन अकॅडमी आयोजित फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्रीरामपूर ः विविध स्वादिष्ट पदार्थांनी सुसज्ज असे स्टॉल्स, विद्यार्थ्यांनी केलेली शिस्तबद्ध तयारी, पालकांची खरेदीसाठीची लगबग, विद्यार्थ्यांच्या

पाणबुडी मोटार चोरी करणारे जेरबंद
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू
पाऊस थांबला, विसर्ग घटला !

श्रीरामपूर ः विविध स्वादिष्ट पदार्थांनी सुसज्ज असे स्टॉल्स, विद्यार्थ्यांनी केलेली शिस्तबद्ध तयारी, पालकांची खरेदीसाठीची लगबग, विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असलेला आनंद व समाधान हे सर्व चित्र पहावयास मिळाले श्रीरामपूरातील पहिल्या मान्यताप्राप्त सीबीएससी विद्यानिकेतन अकॅडमी या स्कूलमध्ये निमित्त होते विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या फूड फेस्टिवलचे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटीबद्ध असणारी संस्था म्हणून विद्यानिकेतन अकॅडमी या संस्थेचे जिल्ह्यात नाव प्रसिद्ध आहे. वार्षिक नियोजनानुसार दरवर्षी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणात वाढ करणे, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करणे, पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहारिक शिक्षण शिकवून भारताचा सुजान नागरिक बनविणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. यावर्षी आयोजित केलेल्या फूड फेस्टिवलचा मानसही असाच आहे. विद्यार्थ्यांमध्ये कष्टाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात विक्री कौशल्य वाढावे, व्यावहारिक ज्ञानाची भर पडावी, स्वच्छतेचे महत्त्व कळावे, आत्मविश्‍वास वाढावा, ग्राहकाभिमुख सेवा कशी द्यावी याचे ज्ञान यावे, हा हेतू ठेवून विद्यानिकेतन अकॅडमी ने या महोत्सवाचे आयोजन केले. या महोत्सवाला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शनिवारी या फेस्टिवलचे आयोजन शाळेच्या कॅम्पस मध्ये करण्यात आले होते. महोत्सवाचे उद्गघाटन संस्थेचे चेअरमन माजी प्राचार्य टी शेळके सर व्हा. चेअरपर्सन डॉक्टर प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ. राजीव शिंदे, श्रीरामपूरचे डीवायएसपी बसवराज शिवपुजे, डॉक्टर अर्चना शेळके, पंचायत समिती शिक्षण विभागाचे शेंडगे साहेब प्राचार्या रंजना जरे, उपप्राचार्या वर्षा धामोरे, समन्वयक अमित त्रिभुवन, कार्यालयीन अधीक्षक सतिश थोरात व सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्य यांच्या हस्ते पार पडले. उद्घघाटनानंतर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांच्या स्टॉलला भेट देऊन फूड फेस्टिवलचा मनमुराद आनंद लुटला. प्रत्येक स्टॉलवर एका चढ एक चवीचे पदार्थ उपलब्ध होते. श्रीरामपूरचे डीवायएसपी  शिवपुजे यांनी शाळेने अत्यंत छान उपक्रम राबविल्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापनाचे व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. या फेस्टिवलचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या फेस्टिवलमध्ये विक्रीसाठी असणारे सर्व पदार्थ मुलांनी स्वतः बनवून आणले व स्वतः विकले. विक्रीसाठी अत्यंत सुबक व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक विक्री स्टॉलवर टोकन सिस्टीम राबवून ग्राहकांना पैसे देऊन पहिले टोकन घेणे बंधनकारक असायचे व तदनंतर मेनू काउंटरला जाऊन खरेदी करावी लागायची. प्रत्येक स्टॉलवर ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्टॉलवरील प्रत्येक विद्यार्थ्यांनी हेअर कॅप, हँड ग्लोज, मास्क या सर्वांचा वापर केला. सर्वात शेवटी प्रत्येक स्टॉल धारकाने कस्टमर फीडबॅक रजिस्टर मेंटेन केले व त्यावर रेटिंग पाईंट मिळविले. या सर्व नियोजनाबद्दल उपस्थित पाहुण्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या शेवटी अनेक पालकांनी प्रत्यक्ष भेटून कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट झाल्याबद्दल शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे मनापासून आभार व्यक्त केले व दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी आग्रह धरला. या कार्यक्रमास राज्याचे माजी महसूल मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपाध्यक्ष श्रीमती शशिकलाताई शिंदे चेअरमन टी. ई. शेळके डॉक्टर प्रेरणाताई शिंदे डॉक्टर राजीव शिंदे एडवोकेट भागचंदजी चुडीवाल श्री प्रकाश निकम पाटील मंगलाताई आढाव शुभांगी ताई देवकर डॉक्टर अर्चना शेळके संजू भाई शहा यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

COMMENTS