Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कराड तालुक्यात बालविवाह मुक्त भारत अभियानास उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड / प्रतिनिधी : कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी बांधला लाकडी सेतू; मोरणा विभागातील गोकुळ धावडे विद्यालयातील शिक्षकांची अनोखी शक्कल
दहिवडी पोलीस ठाण्याला सीसीटीएनएस प्रणालीत सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार
पाटण तालुक्यातील नरबळी प्रकरणाचे कर्नाटक कनेक्शन घट्ट

कराड / प्रतिनिधी : कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाऊंडेशन नवी दिल्ली याच्या वतीने भारतभर सुरू केलेले बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेच्यावतीने कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांद्वारे सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यातील 36 गावात जनजागृती करण्यात आली. या अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.
नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. संपूर्ण देशात बालविवाह प्रथा नष्ट व्हावी या हेतूने हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेने सहभागी होत कॅण्डल रॅलीसह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. कराड तालुक्यात महाविद्यालय परिसरासह वाडीवस्तीपासून विविध गावांमध्ये हे अभियान राबविले. यामध्ये उमेद अभियानातर्गंत असणार्‍या महिला बचत गटातील महिला, एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गंत असणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा स्वंयसेविका, विविध महिला मंडळे, महाविद्यालयीन युवक व युवती, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्कचे विद्यार्थी, ज्ञानदीप कौशल्य विकास संस्थेचे विद्यार्थी, कराड शहर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथक, आगाशिवनगर येथील कचरावेचक महिला, शिक्षक आदींनी सहभाग नोंदविला.

COMMENTS