Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या सूचना

नाशिक : सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ  लसीकरण  मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ  मा जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांच्या हस्ते बालकाला पोल

निळवंडेतून पाणी सोडण्यासाठी चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच
पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ द्या ; आ.सतीश चव्हाण यांची मागणी
गोवरचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी चोपडा नगरपालिका ॲक्शन मोड वरती

नाशिक : सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पल्स पोलिओ  लसीकरण  मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ  मा जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा यांच्या हस्ते बालकाला पोलीओ लसीची मात्रा देऊन करण्यात आले.

जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे सामान्य रुग्णालय येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री जलज शर्मा  व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले प्रसंगी डॉ गोविंद चौधरी उपसंचालक विल्टो  राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे  , डॉ हर्षल नेहेते जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी ,डॉ संदीप सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क विभाग  डब्ल्यू एच ओ प्रतिनिधी डॉ प्रकाश नंदापुरकर डॉ दीपक लोणे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रोहन बोरसे जिल्हा व सामान्य रुग्णालयाचे अधिकारी  कर्मचारी तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी व ग्रामस्थ  आदि मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला  याप्रसंगी मा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओ मोहीम शून्य ते पाच वयोगटातील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील आपल्या परिसरातील सर्व बालकांचे लसीकरणआजच बुथवर जाऊन करून घ्यावे असे आव्हान केले

 तसेच आशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक आशिमा मित्तल, डॉ सुधाकर मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक मार्गदर्शनाखाली व राजेंद्र बागुल अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ युवराज देवरे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सह नियंत्रणात आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक बस स्टॉप वर तसेच रेल्वे स्टेशन विमानतळ या ठिकाणी पोलिओचे लसीकरण करण्यात येणार आहे बालकांमध्ये  होणारा पोलिओ आजार आपण देशामधून समूळ नष्ट केला आहे गेल्या अनेक वर्षापासून पोलिओचा एकही रुग्ण आपल्याला आढळून येत नाही त्यामुळे मिळवलेले यश हे अबाधित  राखणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे या हेतूने आपल्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना हे लसीकरण होणे गरजेचे आहे यासाठी समाजातील प्रत्येक घटकांनी प्रयत्न करणे हे खूप गरजेचे असते त्याप्रमाणे आपण आरोग्य विभागाला साथ द्यावी व जिल्ह्यातील शून्य ते पाच  गटातील सर्व बालकांचे आजच लसीकरण करून घ्यावे असं आवाहन या प्रसंगी माननीय जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा व डॉ गोविंद चौधरी या यांनी याप्रसंगी केले पल्स पोलिओ कार्यक्रमाचा प्रचार आणि प्रसार   करण्यासाठी शनिवारी सर्व शाळांमधून लहान मुलांची रॅली काढण्यात आली होती, पोस्टर, बॅनर, भिंतीवर म्हणी लिहून चांगल्या प्रकारे प्रसार आणि प्रचार करण्यात आला आहे मंगळवार पासून तीन दिवस ग्रामीण भागात व सोमवारपासून पाच दिवस शहरी भागात घरोघरी जाऊन मुलांना आयपीपीआय करण्यात येणार आहे यामध्ये प्रत्येक घरी आरोग्य कर्मचारी येऊन राहिलेल्या मुलांना लसीकरण करणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

COMMENTS