Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा पुण्यात मृत्यू

पुणे ः अहमदनगर येथील विद्यार्थ्याचा पुण्यातील शिवाजीनगर येथील एका वसतिगृहात लिफ्ट बंद पडल्याने त्याने लिफ्टमधून उडी मारल्याने मृत्यू झाल्याची घटन

आत्मा अंतर्गत महिला किसान गोष्टी कार्यक्रम संपन्न
ब्रेन डेड रुग्णाच्या शरीरात डुकराची किडनी प्रत्यारोपित
गेवराई तील दोन वाळु माफियांची हार्सुल काराग्रृहात रवानगी

पुणे ः अहमदनगर येथील विद्यार्थ्याचा पुण्यातील शिवाजीनगर येथील एका वसतिगृहात लिफ्ट बंद पडल्याने त्याने लिफ्टमधून उडी मारल्याने मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. संबंधित विद्यार्थी लिफ्टमधून जात असताना, अचानक लिफ्ट बंद पडली. त्यामुळे बंद पडलेल्या लिफ्टमधून मोकळ्या जागेत उडी मारताना पडल्याने गंभीर जखमी झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचा दुर्देवीरित्या मृत्यू झाला. या दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी वसतिगृहाच्या विश्‍वस्तांसह रखवालदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आला आहे.
अजय अशोक मिरांडे (वय-19, मूळ रा. वैष्णवी बंगला, सावेडी, अहमदनगर) असे या घटनेत मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे विश्‍वस्त, वसतिगृहाचे पर्यवेक्षक अंजना केतन मोतीवाला, रखवालदार सुभाष सुर्वे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवध भादंवि 304 अ, 34 या कलमांनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत अजयचे वडील अशोक मदनलाल मिरांडे (वय 55) यांनी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. अजय मिरांडे हा विद्यार्थी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता तसेच शिवाजीनगर परिसरातील घोले रस्त्यावर जे. पी. त्रिवेदी मेमोरिअल ट्रस्टचे वसतिगृहात राहत होता. 15 मार्च रोजी रात्री सव्वआठच्या सुमारास अजय आणि त्याचे मित्र लिफ्टमधून जात होते. त्यावेळी अचानक तांत्रिक कारणाने लिफ्ट बंद पडली. त्यावेळी रखवालदार सुर्वे याने लिफ्ट बंद पडल्यानंतर विद्यार्थ्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन केले नाही. अजयला लिफ्टच्या डक्टमध्ये उडी मारण्यास त्यांनी सांगितले. अजयने उडी मारल्याने तो तोल जाऊन पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला व हात पायास मार लागल्याने जखम झाली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.

COMMENTS