Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सा.बां.तील शाखा अभियंता कमलापुरेचा भ्रष्टाचाराचा उच्छाद  

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रेसिडेन्सी विभागातील ओल्ड कस्टमला असलेले शाखा अभियंता कमलापुरे यांनी अधिकार्‍यांना आणि काही तथाकथित पत्रकारांना

उपअभियंता बापट, पन्हाड आणि पाटील यांचा कोट्यावधींचा अपहार  
पुण्यात लाचखोर आरटीओ अधिकार्‍याला पदोन्नती
घेणार्‍यांवर कठोर कारवाई करा; किनवटमध्ये संघटना आक्रमक

मुंबई ः सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रेसिडेन्सी विभागातील ओल्ड कस्टमला असलेले शाखा अभियंता कमलापुरे यांनी अधिकार्‍यांना आणि काही तथाकथित पत्रकारांना हाताशी धरून भ्रष्टाचाराचा नवा डाव रचल्याचे दिसून येत आहे. कमलापुरे काही अधिकार्‍यांचे मध्यस्थ असून, यापूर्वी ते मध्य मुंबई विभागामध्ये महेंद्र पाटील यांचे कलेक्टर होते, त्यामुळे या संपूर्ण बाबींवरून सार्वजनिक बांधकाम विभागात कमलापुरेंनी मोठा भ्रष्टाचार करत कोट्यावधी रूपयांचा अपहार केला असून, याप्रकरणी तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गरज आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, कलमापुरे पोद्दार हॉस्पिटल शाखा येथे कार्यरत असतांना त्यांनी चांगलाच भ्र्रष्टाचाराचा उच्छाद मांडला होता. महेंद्र पाटील यांचे कलेक्टर म्हणून त्यांनी कोट्यावधींची माया जमा केली आहे. महेंद्र पाटील यांच्यानंतर आलेल्या कार्यकारी अभियंत्यांचे देखील कमलापुरे कलेक्टर राहिलेले आहेत. गोड बोलून अणि लांगुलचालून करून असलेल्या शाखा अभियंता असलेल्या कमलापुरेंनी कोट्यावधींची संपत्ती जमा केली आहे. तसेच मुख्य अभियंता, सचिव यासारख्या वरिष्ठ अधिकार्‍यांची दिशाभूल करणे, त्यांना खोटी माहिती पुरवणे, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू असलेलेल्या गैरव्यवहाराची माहिती एका पत्रकाराला पुरवून त्या पत्रकारांच्या नावावर असलेले ठेकेदारीचे कामे करण्याचा प्रयत्न कमलापुरे करत आहे. यासोबतच कमलापुरे यांनी गावाकडून मेव्हणा, भाऊ यासह आपले नातेवाईक असणारे तब्बल 8 लोक मुंबईत आणले असून, त्यांच्या नावे ठेकेदारी करण्यात येते, यातून कमलापुरे याने या विभागात भ्रष्टाचाराचा उच्छाद मांंडला असून हा विभाग त्याचे ओरबाडून खाणं सुरू केल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, पोद्दार हॉस्पिटलमध्ये त्यांनी डीपीटीसीचे आणि एमओडबल्यूचे दोन कामं वेगवेगळी दाखवण्यात आली असली तरी, प्रत्यक्षात दोन्ही कामं एकच असून, त्यांनी वेगवेगळे देयकं काढून कोट्यावधींचा अपहार केला आहे. प्रत्यक्षात डीपीटीसीची कामे ही 30 टक्के देखील झालेली नाहीत. मध्य मुंबईत भ्रष्टाचाराचा नवा विक्रम कमलापुरे यांनी स्थापित केला आहे. अनेक लोकांच्या प्रोटोकॉलच्या रकमा पोहोचवण्याचा गोरखधंदा कमलापुरेचा आहे. कमलापुरेची चौकशी होण्यासाठी आम्ही लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली असून त्यासंबंधित पुरावे दिले आहे. यासोबतच कमलापुरे यांची खुली आणि विभागीय चौकशी होणे गरजेचे आहे. शासकीय नियम पायदळी तुडवून नियमबाह्य कामांचा धडाका लावणे, तसेस शासकीय तिजोरीवर दरोडा टाकणार्‍या कमलापुरेंचा इतिहास लातूरपासुनचा आम्हाला माहीत असून, लवकरच त्याचा सविस्तर वृत्तांत आम्ही मांडणार आहोत.

एकाच वेळी तीन-तीन शाखांचा कार्यभार सांभाळणारा दलाल
कारकून ते शाखा अभियंता म्हणून कमलापुरेचा इतिहास चांगलाच रंगतदार आहे. एकाचवेळी एम.टी. शाखा, ओल्ड कस्टम, आणि पोद्दार हॉस्पिट शाखा अशा तीन-तीन विभागांचा कार्यभार कमलापुरे यांच्याकडे कोणत्या नियमान्वये सोपवण्यात आला आहे. खरंतर तीन विभागातून मिळालेल्या दलालीतूनच हा कार्यभाग साधण्यात आला आहे. नियमबाह्य कामांचा धडाका या विभागात लावला असून, प्रचंड आर्थिक माया जमवण्याचा गोरखधंदा कमलापुरेंचा सुरू आहे. त्यांच्या अवैध संपत्तींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करण्याची गरज आहे.

COMMENTS