Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभियंत्याची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी - अनेकदा मुलाखत देऊनही नोकरी लागत नसल्याने निराश आलेल्या तरुण अभियंताने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी

पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पत्नीसह मुलाची हत्येनंतर शिक्षकाची आत्महत्या
प्रियकरासोबतच्या भांडणानंतर ट्रेनी अग्निवीर महिलेची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी – अनेकदा मुलाखत देऊनही नोकरी लागत नसल्याने निराश आलेल्या तरुण अभियंताने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे केंब्रिज शाळेजवळील उड्डाणपुलाच्या रेल्वेपटरी जवळ घडली. मयूर विलास देसले (वय 28, रा. रोशनी हौसिंग सोसायटी, विशालनगर) असे आत्महत्या केलेल्या बेरोजगार अभियंतत्याचे नाव आहे.
मयूर देसले याने इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी पूर्ण केली होती. त्यानंतर तो नौकरीच्या शोधात होता. त्याने अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. मात्र नोकरी काही लागत नव्हती. सतत अपयश हाती पडत होते. तर त्याच्या सोबतचे मित्र हे मात्र नोकरीला लागले होते. त्यामुळे तो आणखीणच अस्वस्थ होता. सतत मिळत असलेल्या अपयशामुळे मयूर खचला होता. त्यातूनच त्याला निराशेने गाठले होते. त्यामुळे तो मागील चार दिवसांपासून घरी कोणाला काही न सांगता निघून गेला होता. कुटुंबीयांनी त्याचा नातेवाईक आणि मित्रांकडे शोध घेतला. मात्र त्याचा शोध लागत नसल्याने 17 नोव्हेंबर रोजी मयूर बेपत्ता असल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात दिली होती. पोलीस त्याचा शोध घेत असतानाच शुक्रवारी पहाटे त्याचा केंब्रिज शाळेजवळील उड्डाणपुलाखाली रेल्वेपटरी जवळ कटलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पी.एन. अवचार हे करीत आहे.

COMMENTS