Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणतांबा-कोपरगाव आणि शिर्डी रस्त्यावरील अतिक्रमण काढावीत

डॉ. धनजंय धनवटे यांची मागणी अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणतांबा ः अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या पुणतांबा-कोपरगाव आणि शिर्डी रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या वेड्या बाभळींची जोडपे सा ,बा, विभागाने आठ दिवसात क

मुलाकडून वयोवृद्ध बापाचा खून
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे पॅचिगकाम चालू
जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला

पुणतांबा ः अपघाताला कारणीभूत ठरणार्‍या पुणतांबा-कोपरगाव आणि शिर्डी रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या वेड्या बाभळींची जोडपे सा ,बा, विभागाने आठ दिवसात काढावीत अन्यथा 28 मे रोजी कोपरगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ धनंजय धनवटे व माजी उपसरपंच महेश चव्हाण यांनी दिला आहे. कोपरगाव आणि शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी अनेकदा मागणी केल्यानंतर नुकतेच या दोन्ही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले असले तरी पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूला गटारी केलेल्या नाही तसेच कामाच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त केली जात असल्याने रस्ता किती महिने टिकणार असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव व शिर्डी रस्त्यावरील वेड्या बाभळी काढाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी केली जात असून रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर बाभळी काढण्यात येतील असे सांगितल्याचे समजते परंतु अद्याप त्याकडे दुर्लक्ष केले जात असून कोपरगाव रस्ता वेड्या बाभळींच्या झुडपांनी वेढला असून वळणाच्या ठिकाणी अचानक वाहन समोरून आल्यानंतर न दिसल्याने अपघात होतात बाभळीच्या झुडपातून अचानक आलेल्या काळविटाचे धडकेने नुकतेच येथील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. कोपरगाव व शिर्डी या दोन्ही रस्त्यावरील वेड्या बाभळीची जोडपे आठ दिवसात काढली जावीत अन्यथा 28 मे रोजी कोपरगाव रस्त्यावर सर्वपक्षीय च्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा धनवटे व चव्हाण यांनी दिला आहे.

वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ – रस्तापूर परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या वेड्या बाभळी तसेच पाण्यामुळे हरीण काळवीट या सह अन्य वन्य प्राण्यांच्या यामुळे पिकांचे होणारे नुकसान शेतकरी सहन करीत असले तरी यामुळे कोणाला जीव गमावा लागत असल्याने रस्त्यावर अतिक्रमण कलेले वेड्या बाभळीची जोडपे तातडीने काढल्यास वन्यप्राणी रस्त्यावर येताना दिसली जाणार आहे, अशी मागणी ग्रामस्थातून केली जात आहे.

COMMENTS