Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धुंडा येथे जि.प.शाळेच्या जागेवर अतिक्रमण

किनवट प्रतिनिधी - येथून जवळ असलेल्या मौजे दूड्रा ता.  किनवट येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेला खेळाचे मैदान नाही . मुलांना प्रार्थना आदी.विद्यार्थ

मुख्यमंत्री, राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्यात कोट्यावधींचा घोटाळा l पहा LokNews24
राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडे भिंगार व नगर युवकांच्या कार्याचा अहवाल केला सादर
तरुणाचा प्रवरा नदीत बुडून मृत्यू

किनवट प्रतिनिधी – येथून जवळ असलेल्या मौजे दूड्रा ता.  किनवट येथील जिल्हा परिषद शाळा या शाळेला खेळाचे मैदान नाही . मुलांना प्रार्थना आदी.विद्यार्थ्यांना खेळण्यासाठीतसेचआणि शालेय  कार्यक्रम घेण्यासाठी जागा नाही येथील काही लोकांनी शाळेच्या जागेत टीनशेड टाकून अतिक्रम केले असल्याचे दिसून येते ते त्वरित काढण्यात यावी अन्यथा आमरण उपोषण बसण्याच्या इशारा संभाजी ब्रिगेडचे ता.  सचिव समाधान रामराव उटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
डूड्रा येथील जिल्हा परिषद शाळेची जागा वापरण्यासाठी अपुरी असून पुन्हा काही लोकांनी जिल्हा परिषद शाळेच्या जागेवर अतिक्रम करून त्या जागेत टीनाचे शेड टाकून त्या ठिकाणी कॅरम , वेल्डिंगचे शॉप आधी धंदा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.  मुले शाळेत न येता तिथे कॅरम खेळायला जातात . शिक्षणाच्या पवित्र जागेवर अतिक्रम करून तिथे कॅरमच्या धंदा सुरू केला असल्याने अज्ञात मुले तिथे जाऊन कॅरम खेळतात.  यामुळे मुलांचा शैक्षणिक क्षेत्रावर परिणाम होत आहे.  मुलांनी या पासून काय बोध घ्यावा असा प्रश्न पालकातून व्यक्त होत आहे.  या अवैध धंद्याबद्दल येथील संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव समाधान रामराव उटकर यांनी यासंबंधी तक्रार दिल्याने या तक्रार धारक यांना तू तक्रार का दिली म्हणून बेदम मारहाण करून तक्रार वापस घे अन्यथा तुला जीवे मारून टाकतो म्हणून धमकी देण्यात येत आहे. तुझ्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करतो असे म्हणून हेतू परस्पर त्रास देत असल्याने समाधान उटकर यांनी संबंधित वरिष्ठ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नांदेड ,पोलीस स्टेशन सिंदखेड गटशिक्षणाधिकारी किनवट यांना दिलेल्या निवेदनाद्वारे चौकशीची मागणी करून अतिक्रम धारकावर गुन्हा दाखल करण्यात यावा व मला संरक्षण देण्यात यावे, माझे काही बरे वाईट झाल्यास किंवा खोटा गुन्हा दाखल झालास हा सर्व लोक जबाबदार राहील अशी मागणी केली आहे.

COMMENTS