कर्मचार्‍यांनो कामावर या, एसटी पूर्वपदावर आणा : शरद पवारांचे आवाहन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्मचार्‍यांनो कामावर या, एसटी पूर्वपदावर आणा : शरद पवारांचे आवाहन

मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाचा ओमायक्रॉन नवीन अवतार आल्याने देशावर आणि राज्यावर संकट आले. यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप राज्याला परवडणारा नाही, त्याचा प

पशुधनाचे मोफत लसीकरण करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ः मंत्री विखे
उजनी धरणातून कालव्याद्वारे एक आवर्तन सिंचनासाठी देण्यात यावे
नुपूर-नवीन निष्कासन : एक अन्वयार्थ !

मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाचा ओमायक्रॉन नवीन अवतार आल्याने देशावर आणि राज्यावर संकट आले. यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप राज्याला परवडणारा नाही, त्याचा परिणाम अर्थकारणावर होत असल्यामुळे एसटी कर्मचार्‍यांनी कामावर या, आणि एसटी पूर्वपदावर आणा असे आवाहन राष्ट्रवादी काँगे्रसचे शरद पवार यांनी केले. सोमवारी एसटी कृती समितीच्या 22 संघटना आणि परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. यानंतर पवार माध्यमांसमोर बोलत होते.
कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्‍न आहेत, त्यातील काही प्रश्‍न कृती समितीने सरकारच्या नजरेत आणून दिलेत. त्याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, असे राज्य सरकारने सांगितले. त्यानंतर एसटी चालू झाली पाहिजे, कर्मचार्‍यांनी कामावर यायला पाहिजे, असे पवार म्हणाले. तुमच्या इतर प्रश्‍नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेन, अशी ग्वाही यावेळी पवारांनी दिले. कृती समिती आणि कामगार समितीचे जेवढे प्रतिनिधी आहेत, त्यांचा कामगारांच्या हिताबद्दलचा जो अर्ज आहे, त्यात प्रवाशांचे हित आणि एसटी टिकली पाहिजे याबाबत उल्लेख आहे. त्यांच्या सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी राज्यातील एसटी कर्मचार्‍यांना कामावर येण्याचे आवाहन केले, ही आनंदाची बाब असल्याचं पवार म्हणाले. आम्ही कामगारांच्या समस्या मनावर घेणार नाही, असा समज काही लोकांनी पसरवला होता, त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे हा संप सोडवायला दोन महिने लागले. अन्यथा एवढा वेळ लागलाच नसता. तसेच आम्ही हा संप सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत, असे शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, यासंदर्भात बोलतांना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले की, चर्चा करुन मार्ग काढायचा असेल तर एसटी सुरु करा. कर्मचार्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विलिनीकरणाची लढाई सुरुच राहील. पण त्यांनी अगोदर कामावर हजर व्हावे, असे आवाहन एसटी कृती समितीने केले आहे. विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. जे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत, त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यापैकी अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. तर काहींना बडतर्फीच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले आहे. कर्मचारी कामावर न परतल्याने राज्यातील अनेक भागात एसटीची सेवा अगदी कमी प्रमाणात आहे. यामुळे प्रवाशांचेही हाल होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर एसटी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कामावर येण्यासाठी कर्मचार्‍यांना तीन दिवसांची मुदत : मंत्री परब
विलीनीकरणाबाबतचा अहवाल 3 आठवड्यांत न्यायालयात सादर केला जाईल. सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विचार करुन निर्णय घेतला जाईल. कामावर परत येण्यासाठी कर्मचार्‍यांना 3 दिवसांचा मुदत वाढ दिली आहे. कर्मचार्‍यांनी कोणतीही भीती न बाळगता कामावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. यात ज्या संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची किंवा बडतर्फी पर्यंतची कारवाई करण्यात आलेली नाही. अशा (सुमारे 55 हजार कर्मचारी) कर्मचार्‍यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे!त्यांच्यावर एसटी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले. त्यानुसार कृती समितीमधील संघटनांनी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे.

गुणरत्न सदावर्तेची हकालपट्टी
एसटी कर्मचार्‍यांची बाजू मांडत असलेले अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटना भडकल्या आहेत. त्यांच्या आक्रस्ताळेपणामुळे चूल बंद होण्याची वेळ आल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे. त्यामुळे या संघटनांनी अ‍ॅड सदावर्ते यांची हकालपट्टी करण्यात आली असून, न्यायालयीन लढाईसाठी दुसरा वकील देणार असल्याची घोषणा देखील या संघटनांनी केली आहे.

COMMENTS