बीड प्रतिनिधी - आज सोशल मीडियाच्या गराड्यात युवा वर्ग गुंतलेला दिसत असून वाचन संस्कृती रुजवणे आज काळाची गरज बनली आहे, सजग युवा वर्गांनी ऑनलाइन वा

बीड प्रतिनिधी – आज सोशल मीडियाच्या गराड्यात युवा वर्ग गुंतलेला दिसत असून वाचन संस्कृती रुजवणे आज काळाची गरज बनली आहे, सजग युवा वर्गांनी ऑनलाइन वाचना ऐवजी ऑफलाईन वाचनावर भर देऊन सोशल मीडियात न रमता वाचनात व्यस्त व्हावे, असे आवाहन राहुल मोरे यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त केले आहे.
भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिन 350 शिवराज्याभिषेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव शिवचरित्र पर पुस्तकाच्या वाचनाचा ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित करून साजरा करण्याचे ठरवले असून, ही बाब अतिशय प्रभावी-प्रेरणादायी-चांगली असून या माध्यमातून सर्व स्तरावर शिव विचारांचा जागर होणार आहे. आजची प्रत्येक ठिकाणची परिस्थिती बघता लोक तासंन्तास मोबाईलवर बोटे फिरवताना सोशल मीडियात गुंतलेले आपणास दिसतात ही बाब चिंतेची असून, कोणतेही माहिती एका क्लिकवर मिळत असली तरी प्रत्येकाने पुस्तक वाचनावर भर देऊन आपले विचार वृद्धिंगत करत प्रगल्भ व्हावे. मानवी जीवन सकारात्मक,आशावादी, ऊर्जायुक्त बनवण्याचे कार्य पुस्तक करत असते व आपले जीवन प्रेरणादायी बनवते. काही पुस्तके जगायला, तर काही पुस्तकातून लढायला, तर काही मधून कसं जगायचे शिकून येणार्या संकटावर कशी मात करायची याची प्रेरणा देतात, म्हणून प्रत्यक्ष वाचणावर भर देऊन वाचन संस्कृती रुजवणे प्रत्येकाची जबाबदारी असून येणार्या पिढीसाठी वाचन संस्कृती रुजवणे आपले कर्तव्य म्हणून कार्य करणे,आज गांभीर्याने घेणे आज गरजेचे आहे असेही आवाहन यावेळी त्यांनी केली.
COMMENTS