Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी दूर करा

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सूचना

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संकणकीकरण प्रकल्पाची अंमलबजाणी सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक ओळख पटवून

एटीएम कार्ड बदलून लुट करणारी टोळी जेरबंद
राशीनच्या पालखी उत्सवातून 6 चोरटे ताब्यात
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टपरी चालकाची गळाफास घेऊन आत्महत्या | ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | LokNews24

मुंबई : सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संकणकीकरण प्रकल्पाची अंमलबजाणी सुरू आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमॅट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरणासाठी रास्तभाव दुकानांमध्ये 4-जी तंत्रज्ञान असलेल्या ई पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. या ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरणामध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने ई-पॉस प्रणालीमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत.
या तांत्रिक अडचणी एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हरशी संबंधित असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे. या तांत्रिक अडचणी दूर करण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील एकही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत असून अडचणी लवकरच दूर होतील अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिली आहे.

COMMENTS