कर्जत : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाने या योजनेसाठी बजेटमध्ये अनोखी तरतूद केलेली आहे. कर्जत
कर्जत : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाने या योजनेसाठी बजेटमध्ये अनोखी तरतूद केलेली आहे. कर्जत व जामखेड तालुक्यातील एकही पात्र महिना या योजनेपासून वंचित राहणार नाही याची योग्य ती खबरदारी घेऊन प्रशासनाने त्याची तंतोतंत पालन करावे, अशा सूचना कर्जत- जामखेड मतदारसंघस्तरीय समितीचे अध्यक्ष आ. प्रा. राम शिंदे यांनी अधिकार्यांना दिल्या. कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
तहसीलदार गुरु बिराजदार, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, प्रकल्प अधिकारी प्रशांत मिटकरी, मुख्याधिकारी अजय साळवे, समितीचे अशासकीय सदस्य धनंजय मोरे, बापूराव ढवळे, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील यादव, भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, शिंदे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके, उपसभापती आबासाहेब पाटील, काकासाहेब धांडे, दीपक जंजिरे, नंदराम नवले, नंदलाल काळदाते, स्वप्निल तोरडमल, धनंजय आगम आदी उपस्थित होते. आ. राम शिंदे पुढे म्हणाले, या योजनेचे अर्ज भरण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघ जिल्ह्यात दुसर्या क्रमांकावर आहे. या योजनेच्या प्रचार प्रसारासाठी अधिकार्यांनी चांगले काम केले असून लाभार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. तरीही अद्याप अर्ज केलेले नसलेल्या महिलांनी तात्काळ या योजनेसाठी अर्ज करावेत. लवकरच पुढची बैठक होईल आणि 17 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल. आतापर्यंत कर्जत तालुक्यातून 38147 जामखेड तालुक्यातून 27639 अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती आ. शिंदे यांनी दिली.
COMMENTS