Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेट्रोने ब्रेक दाबताच मिळणार वीज

पुणेरी मेट्रो ठरणार पर्यावरणपुरक

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरामध्ये वेगाने मेट्रोचे विस्तारीकरण होत असून, यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. मात्र वाहतूक कोंडीतून प

अखेर पुणे मेट्रो मार्गिकेच्या विस्ताराला गती
गणपतीत पुणे मेट्रो रात्री 12 पर्यंत सुरू राहणार
ऐन दिवाळीत पुणे मेट्रोचे उत्पादन घटले

पुणे/प्रतिनिधी ः पुणे शहरामध्ये वेगाने मेट्रोचे विस्तारीकरण होत असून, यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. मात्र वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होण्याबरोबर, मेट्रोने ब्रेक दाबताच वीज मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा हा थक्क करणारा अनुभव पुणेकरांना मिळणार आहे. हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारी पुणे मेट्रो लाईन 3 म्हणजेच पुणेरी मेट्रो पर्यावरणपूरक ठरणार आहे. संपूर्णपणे ‘ओव्हरेड’ असलेल्या 23.3 किमी अंतराच्या पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक अशा ‘रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’चा वापर होणार आहे. यामुळे ‘पुणेरी मेट्रो’ ब्रेक लावेल, त्यावेळी घर्षणातून निर्माण होणारी ऊर्जा साठवून घेतली जाईल आणि त्यातून वीज निर्माण होईल. या ब्रेक दाबण्यातून निर्माण झालेल्या आणि साठवलेल्या वीजेचा वापर पुन्हा मेट्रो चलविण्यासाठी केला जाणार आहे.
याबाबत पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर म्हणाले की, पुणेरी मेट्रो प्रवाशांना सुखद अनुभूती देतानाच शहराच्या पर्यावरणाला पूरक अशी कामगिरी करणार आहे. या अंतर्गत मेट्रोच्या कामकाजामधून होणार्‍या कार्बन उत्सर्जनामध्ये नियंत्रण राखणे, ते कमी करण्याकडे भर दिला जाणार आहे. यासाठीचा एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ऊर्जेची पुनर्निर्मिती किंवा फेरवापर करणे. हा फेरवापर शक्य करणारी अत्याधुनिक अशी ‘रीजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी’ पुणेरी मेट्रोमध्ये वापरण्याची योजना आहे. रीजनरेटिव्ह ब्रेकिंग ही एक ऊर्जा पुनर्प्राप्ती यंत्रणा आहे. यात वाहन किंवा वस्तूची गतीशील ऊर्जा त्वरित वापरता येईल किंवा संग्रहित करता येईल, अशा स्वरूपात रुपांतरित केली जाते. मेट्रो गाडीच्या प्रक्रियेत जेव्हा ब्रेक लावला जातो त्यावेळी गतीज ऊर्जा सोडली जाते आणि ती मोटरमधील विद्युत प्रवाहात साठवली जाते. मेट्रो गाडीच्या बॅटरीजमध्ये वितरीत होणारी अशी वीज इलेक्ट्रिक जनरेटर म्हणूनही कार्य करते. ही ऊर्जा-बचत प्रक्रिया असते. कारण पुन्हा निर्माण केलेली विद्युत ऊर्जा त्याच गाडीला किंवा मार्गावरील इतर मेट्रो गाड्यांना वापरता येऊ शकते.

COMMENTS