Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा

नागरिक हैराण, आंदोलन करत केला संताप व्यक्त

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा सुरु असून केव्हाही वीज गायब होत असून ऐन उन्हाळ्यात हा खेळखंडोबा सुरु असून त्यामुळे नागरिक आणि

नगरमध्ये दंगली घडवण्याचे षडयंत्र शिजत आहे काय? : शहर काँग्रेसची पोलिसांना विचारणा
भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी
मुलांनी आई-वडिलांचा त्याग आणि कष्ट विसरु नये : विखे

कोपरगाव/प्रतिनिधी ः कोपरगाव शहरात विजेचा खेळखंडोबा सुरु असून केव्हाही वीज गायब होत असून ऐन उन्हाळ्यात हा खेळखंडोबा सुरु असून त्यामुळे नागरिक आणि वैद्यकिय सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करून मंगळवारी धरणे आंदोलन केले आहे. आता गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पार्याने चाळीशी ओलांडली असल्याने वातावरणात प्रचंड उकाडा देखील वाढला आहे.त्यातच वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने लहान मुलांसह नागरिक हैराण झाले आहे. दिवसभर होणार्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक घामाघुम होत असून महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे-भरत मोरे,माजी अध्यक्ष,कोपरगाव शहर शिवसेना.
महावितरण कंपनीच्या बेताल व भोंगळ कारभारामुळे नागरिक व्यावसायिक वैतागले असून महावितरण कंपनी आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या ग्राहकांना पूर्व सूचना न देता केंव्हाही वीज घालवत असून केंव्हाही वीज प्रवाह सोडत असल्याने अनेकांना या लहरी पणाचा फटका बसत आहे.विशेषतः याचा फटका वैद्यकिय सेवेला बसत असून या खेरीज तीव्र उन्हाळा असल्याने दुपारी याचा फटका सामान्य नागरीकांना बसत आहे.त्यामुळे नागरिक, महिला, लहान बालके आदी घटक वैतागले असून त्या विरोधात आज शिवसेनेचे माजी  शहराध्यक्ष भरत मोरे व त्यांच्या सहकार्‍यांनी आज महावितरण कंपनीच्या या बेताल पणाच्या विरुद्ध धरणे आंदोलन केले आहे. दरम्यान त्यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता खंदारे यांनी  उपस्थित आंदोलकांना आश्‍वासन दिले असून येथून पुढे असे होणार नाही असा दिलासा दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी व आंदोलकांनी संमाधान व्यक्त केले आहे. सदरप्रसंगी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड,योगेश गंगवाल, सुनील फंड आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS