Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळाच्या पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार लवकरच

राहुरी/प्रतिनिधी ः मुळा धरणावरील उजव्या कालव्याअंतर्गत 279 पाणी वापर संस्थांच्या लवकरच निवडणुका होणार असल्याने कार्यकारी अभियंता यांनी मतदार याद्

शिर्डीचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले
बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार
बनावट लस देऊन 390 लोकांकडून 5 लाख रुपये हडपण्याचा आरोप l पहा LokNews24

राहुरी/प्रतिनिधी ः मुळा धरणावरील उजव्या कालव्याअंतर्गत 279 पाणी वापर संस्थांच्या लवकरच निवडणुका होणार असल्याने कार्यकारी अभियंता यांनी मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे. मुळा पाटबंधारे विभागांतर्गत मुळा धरणाचा उजवा कालव्या वरील 279 पाणी वापर संस्थांच्या संचालक मंडळांचा कार्यकाळ संपल्याने लवकरच निवडणुका होणार आहेत. विभागाच्या कार्यकारी अभियंता कु. सायली पाटील यांनी पाणी वापर संस्थांच्या मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर केला असून, अंतिम मतदार यादी मे महिन्यामध्ये जाहीर केली जाणार आहे.
मुळा धरण प्रकल्पांतर्गत डावा व उजवा कालव्यांवर तीनशे हून अधिक पाणी वापर संस्था कार्यरत आहेत. उजवा कालव्यावर राहुरी ,पाथर्डी, नेवासा आणि शेवगाव तालुक्यामध्ये 279 पाणी वापर संस्था आहेत. लघु वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापन समिती संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला असल्याने संचालक मंडळाची निवडणूक घेण्याचे पाटबंधारे विभागा कडून प्रस्तावित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 500 हेक्टरच्या आत नऊ सदस्य तर 500 हेक्टरच्या वर बारा सदस्य असा पाणी वापर संस्थांचा संचालक मंडळ असून 24 मार्च पर्यंत मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत. 27 मार्च ला याद्या प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जाणार आहेत. 24 एप्रिल ला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, 31 मार्चपर्यंत हरकतींवर स्वीकारून 16 एप्रिल पर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील. 15 मे 2023 ला अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता मुळा धरणाच्या उजव्या कालव्या अंतर्गत शेतकरी आणि धरणाची लाभधारक यांच्यातही या निवडणुकीबाबत उत्सुकता नेहमीच राहिलेली आहे. आता लवकरच पाणी वापर संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने धरणाच्या लाभार्थ्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

COMMENTS