नवी दिल्ली : उत्तरप्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निर्धारित वेळेतच होणार असून, यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक
नवी दिल्ली : उत्तरप्रदेशासह पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक निर्धारित वेळेतच होणार असून, यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी माध्यमांना संबोधित करतांना दिले.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आमची भेट घेतली आणि आम्हाला सांगितले की विधानसभा निवडणुका सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून वेळेवर व्हाव्यात. याबाबत 3 दिवस आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी 5 जानेवारी रोजी येणार आहे. निवडणुका नियोजित वेळेतच होतील. सुमारे 1 लाख मतदान केंद्रे त्यासाठी उभारण्यात येतील. त्याचबरोबर मतदानाचे वेब कास्टिंग केले जाईल. मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट मशीन्स योजना करून मतदान प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक करण्याची निवडणूक आयोगाची योजना असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मतदानाच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येतील. परंतु मतदान सकाळी 8.00 वाजल्यापासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत घेतले जाईल, अशी माहिती देखील त्यांनी दिली. उत्तर प्रदेशात नवीन मतदार आणि महिला मतदारांची संख्या 52 टक्क्यांनी वाढली आहे. सर्व राजकीय पक्ष वेळेवर निवडणुकीच्या बाजूने आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. आगामी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली. यात कोविड महामारी काळात कशाप्रकारे निवडणुकीचे नियोजन असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी कोरोनाच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती. ज्यामध्ये ओमिक्रॉनच्या सावटाखालीच मतदानाला सामोरे जावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व उपाययोजना करण्यात येणार असून निवडणूक राज्यात लसीकरणाला वेग देण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली.
कोरोनाबाधित व्यक्ती घरूनच करू शकतात मतदान
मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे, याचाच एक भाग म्हणून 80 वर्षे वयोगटवरील वृद्ध आणि कोरोनाबाधित व्यक्ती हे घरात राहूनच मतदान करू शकतील. निवडणूक आयोग कर्मचारी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान घेऊ शकतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सुशील चंद्रा यांनी केली आहे.
COMMENTS