शिवद्रोही छिंदमच्या रिक्त जागेवर होणार निवडणूक…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवद्रोही छिंदमच्या रिक्त जागेवर होणार निवडणूक…

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा मनपातील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद शासनाने रद्द केले

’पासष्टी’ सारखी पुस्तकनिर्मिती माणुसकीची संस्कृती ः लेविन भोसले
पुणे-नाशिक महामार्गावर पिकअप पलटी.
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणारा मनपातील भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद शासनाने रद्द केले असून, त्याच्या रिक्त जागेर आता येत्या 21 डिसेंबरला निवडणूक होणार आहे. मनपाच्या प्रभाग 9 (क) या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.
उपमहापौरपदावर असताना छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे मनपाच्या तत्कालीन महासभेेने त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला व तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. दरम्यानच्या काळात मनपाची 2018मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली व छिंदमने या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो विजयी झाला होता. पण त्यानंतर महासभेेने त्याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा केलेला ठराव राज्य सरकारने मंजूर केल्याने त्याचे अपक्ष नगरसेवकपदही संपुष्टात आले. तेव्हापासून ही प्रभाग 9 (क) ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी 21 डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. या प्रभाग 9 मध्ये निवडणूक आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे. प्रभाग 9 मध्ये 18 हजार 394 मतदार आहेत. डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत या प्रभागातून चार नगरसेवक निवडून आले आहेत. प्रभाग 9 (क) रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची मोठी भाऊगर्दी राहणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कार्यरत असल्याने या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास या पोटनिवडणुकीत महाविकास आणि भाजप अशी सरळ लढत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS