मुंबई ः शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. चार जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी 10 जूनरोज
मुंबई ः शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका बुधवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. चार जागांसाठी ही निवडणूक होत असून, त्यासाठी 10 जूनरोजी मतदान होणार आहे. मुंबई, आणि कोकण विभाग तसेच मुंबई आणि नाशिक मतदारसंघाचा यात समावेश आहे.
चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार असल्यामुळे 10 जून रोजी मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये मतदान पार पडणार आहे. 10 जून रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 13 जून रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. 18 जून अगोदर मतदानाची संपूर्ण प्रकिया पार पडणार आहे. आता राज्यात लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडाल्यानंतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक पार पडणार आहेत. आज या निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. राज्यात सगळ्यांचं लक्ष पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांकडे लागलेले होते.
COMMENTS