Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधानपरिषद सभापतीपदाची उद्या निवडणूक

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी देखील विरोधकांनी परभणी आणि बीड मुद्दयावरून सरकारची कोेंडी करण्याचा प्रयत्न केला. विर

मलायकाने शेअर केला अर्जुनचा न्यूड फोटो
नव्या घोषणांसह दिलासादायक अर्थसंकल्प!
ऑनलाईन रम्मीसाठी नोकराने केली 38 लाखाची चोरी
Chairman of Maharashtra Legislative Council Election: विधान परिषदेच्या सभापतीपदाची  निवडणूक 19 डिसेंबरला होणार | LatestLY मराठी

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी देखील विरोधकांनी परभणी आणि बीड मुद्दयावरून सरकारची कोेंडी करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी या दोन्ही घटनेवरून सभागृहात मुद्दा उपस्थित मुद्दा उपस्थित केल्यानंतर सरकारच्या वतीने चर्चेची तयारी दाखवण्यात आली. मात्र, मंगळवारी चर्चा घेण्यात न आल्याने काँगे्रसने कामकाजावर बहिष्कार टाकला तर, दुसरीकडे विधानपरिषदेच उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी विधानवरिषदेचे निवडणूक उद्या 19 डिसेंबरला होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे विधानपरिषद सभापतीपद कुणाला मिळते, त्याचे उत्तर उद्याच पाहायला मिळणार आहे.
कालदेखील विधानसभेत बीड आणि परभणी जिल्ह्यातील घटनेचे तीव्र पडसाद उमटले.आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार नमिता मुंदडा यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत वाल्मिक कराड याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे परभणी आणि बीडमधील घटनेवरुन चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली. मात्र, या विषयावर उद्या चर्चा होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. मात्र, विरोधकांनी आज मंगळवारी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकारने आज चर्चा करण्यास नकार दिला. त्यावरुन अखेर विरोधक सभात्याग करत असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. त्यानंतर विरोध पक्षातील सर्व आमदारांनी सभात्याग केला. यासोबतच विधानपरिषदेत मागील दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवडणूक 19 डिसेंबरला होणार आहे.

COMMENTS