संगमनेर : संगमनेर बसस्थानकावरील प्लँटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असत
संगमनेर : संगमनेर बसस्थानकावरील प्लँटफार्मवर बस लावत असताना पुढील टायरखाली सापडून वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. सखूबाई महादू चव्हाण (वय 84 रा आश्वी खुर्द) असे मयत महीलेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक-पारनेर बस (क्रमांक एम. एच. 11 बी. एल. 9409) नाशिकहून संगमनेर बसस्थानकावर आली होती. याचवेळी सखुबाई चव्हाण ही जेष्ठ महीला आपल्या मुलीबरोबर बसस्थानकावर चालली होती. याच दरम्यान बसचालक प्लँटफार्मवर प्रवाशांची चढ उतार करण्याकरिता बस लावत असतांना अचानक ती पुढील बाजुच्या टायर खाली सापडली. यात टायर महिलेच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. काही कळायच्या आतच हा अपघात घडल्याने महीलेचे दोन्ही पाय निकामी झाले. ही घटना लक्षात येताच नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यामुळे काही नागरिक, प्रवाशी मदतीसाठी धावले. तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहीकेतुन महिलेला प्रथम नवीन नगररोडवरील खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तीला लोणी येथे नेण्याचा सल्ला दिला. जखमी महीलेला लोणी येथिल रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच तिचे निधन झाले असल्याची माहिती आगार प्रमुख गुंड यांनी दिली. या घटनेनंतर बस चालक स्वतः शहर पोलिस स्टेशनला हजर झाला असून शहर पोलिस पुढील तपास करत आहे.बसस्थानकावर पोलिस चौकी असून या ठिकाणी पोलीसाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र अधिकारी बदलून गेल्यानंतर याकडे दुर्लक्ष होते. सध्या बसस्थानकात पोलिसाची नेमणूक करण्यात आली नाही. चोरी, अपघात, हाणामारी अशा घटना घडतेवेळी पोलिस हजर नसतात असे प्रवाशांनी सांगितले.
बसस्थानकात झालेल्या अपघाताबाबत शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहे. रविंद्र देशमुख, पोलिस निरीक्षक शहर पोलिस स्टेशन.
COMMENTS