Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागूनही मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ग

बिहारमध्ये भीषण अपघात; 9 जणांचा जागीच मृत्यू
राज्याच्या पहिल्या मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदी राम नाईक
आरक्षणशिवाय मराठा समाज स्वस्थ बसणार नाही ः दिनेश लव्हाट

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागूनही मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडलेला नाही. भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महायुतीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत. मात्र शपथविधीबाबत अद्याप सस्पेंस कायम असतांनाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 अंश सेल्सिअसचा ताप आला आहे. यामुळे ते शनिवारी दिवसभर घराबाहेर पडले नाहीत. डॉक्टरांनी त्यांना घरातच सलाईन लावली आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळातच शिंदे यांची प्रकृती बिघडल्यामुळे महायुती सरकारचा प्रस्तावित शपथविधी सोहळा आणखी लांबतो की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

COMMENTS