एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मु

धर्म काय कामाचा ?
मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण
ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये झपाट्याने वाढ | पहा Lok News24

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा कोण सांभाळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुख्यमंत्रीपदी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे असतील असे अंदाज बांधले जात होते. मात्र हे सर्व तर्क फोल ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील असं जाहीर केलं आहे. आज संध्याकळी एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

COMMENTS