एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

भाजपचा पुन्हा एकदा मास्टरस्ट्रोक

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष संपला असून, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेत

जीवनातील कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर कृष्ण चरित्रात आहे ः जगदीश महाराज
आम्ही काम करतो, फोटोबाजी नाही ; आ. जगताप यांचा विरोधकांना सूचक टोला, आयुर्वेदला नवीन आयडीयु सुरू
दहावी, बारावीच्या परीक्षेला 10 मिनिटे अतिरिक्त

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तासंघर्ष संपला असून, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून घेतली. मात्र या संपूर्ण शपथविधीदरम्यान चर्चा होती देवेंद्र फडणवीस यांची. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे सर्वांनाच आश्‍चर्यांचा धक्का बसला आहे. आपण स्वतः मंत्रिमंडळात नसणार असल्याचे सांगितल्यावर पडद्याआडून अनेक हालचालीनंतर भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन करून, त्यांना सत्तेत सहभागी होण्याची सांगितल्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचे बोलले जात आहे.
आपण पक्षाचा शिपाई असून, पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचा संकेत देवेंद्र यांनी आपल्या कृतीतून दिला आहे. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथसोहळयात मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. या शपथविधी सोहळयात केवळ एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील काही दिवसांत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र शपथविधीपूर्वी एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केली. त्यांचा हा महाराष्ट्राला अनपेक्षित असा धक्का होता. भाजपकडे तब्बल 106 आमदारांचे पाठबळ आणि अपक्षांचा पाठिंबा असतांना देखील भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबादारी सोपवण्यात आली. एकनाथ शिंदे आज सकाळीच गोव्यातून मुंबईमध्ये दाखल झाले होते. त्यांना केंद्र सरकारने झेड सुरक्षा पुरविली असून, त्यांनी काही वेळ फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर चर्चा केली. त्यानंतर फडणवीस आणि शिंदे एकाच गाडीत राजभवनवर दाखल होऊन त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. यावेळी शिंदे गटाला भाजपने पाठिंबा दर्शवित असल्याचे पत्र दिले. त्यानंतर फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि 16 अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय केली आहे, आण्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. लवकरच पुढची कारवाई करुन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करु. या विस्तारात शिंदे यांच्यासोबत असलेले, अपक्ष आणि भाजपाचे सर्व लोक या मंत्रिमंडळात येतील. मी स्वत: बाहेर असेन. पण हे सरकार पूर्ण, व्यवस्थित चालले पाहिजे ही जाबाबदारी माझीदेखील असेल. त्यासाठी पूर्ण साथ आणि समर्थन मी या सरकारला देणार, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

COMMENTS