नाशिक - तपोवन येथे अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्ररनेने व प्रमुख उपस्थितीत जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा

नाशिक – तपोवन येथे अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्ररनेने व प्रमुख उपस्थितीत जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या जल्लोषात सुरू आहे. या सोहळ्यास संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचे १४ वे वंशज श्रद्धेय योगीराज महाराज यांनी भेट दिली. जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्यास उपास्थितीत हजारो भाविकांना मार्गदर्शन करतांना त्यांनी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या गुरू कार्याचा गौरव केला. भागवत ग्रंथाचा सर्वाधिक प्रचार प्रसार करणाऱ्या शांतिगिरीजी महाराजांना पैठण येथे नुकत्याच झालेल्या सोहळ्यात महाभागवत पदवी प्रदान करतांना यामुळेच आम्हांला विशेष आनंद झाला. एकनाथ महाराज यांचे गुरू जनार्दन स्वामी आणि आवडते शिष्य शांतिब्रह्म एकनाथ महाराज इकडेही तसेच शांतिगिरीजी महाराज यांचे गुरू जनार्दन स्वामी आणि आवडते शिष्य शांतिगिरीजी महाराज हे गुह्य समजून घ्या असेही श्रद्धेय योगिराज महाराज म्हणाले.बाबाजींच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात एक वेगळीच अनुभूती व चैतन्य असल्याचे योगीराज महाराज यावेळी म्हणाले.
COMMENTS