Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय कर

शिंदे गटाचे आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले नवरे
पुढील 15 दिवसांत स्वगृही परतणार ः एकनाथ खडसे
फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर दिली होती

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करुन दिली आहे. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सुत्रे हलवली आहेत. रविवारी दुपारच्या सुमारास खडसे यांना छातीमध्ये दुखत होते. त्यानंतर तात्काळ त्यांना स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना याची माहिती कळल्यानंतर त्यांनी खडसे यांना उपचारासाठी मुंबईत आणण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांच्यासाठी एअर अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करण्यात आली आहे.

COMMENTS