Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक शाम मुहम्मद रफी सहाब के नाम कार्यक्रमाचे आयोजन 31 जूलै रोजी

बीड प्रतिनिधी- येत्या 31 जुलै 2023 रोजी जगविख्यात पार्श्वगायक मरहूम मुहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्या

भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला वीज खरेदी करण्यास मान्यता
मराठी पत्रकार परिषद संलग्न हल्ला विरोधी कृती समितीच्या धारुर तालुका निमंत्रक पदी  देशमुख तर समन्वयकपदी  कुलकर्णी
मूकनायक समजून घेतल्याशिवाय बहुजनांची मुक्ती नाही !

बीड प्रतिनिधी- येत्या 31 जुलै 2023 रोजी जगविख्यात पार्श्वगायक मरहूम मुहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकीय विश्रामगृहासमोर, अहेमदनगर रोड, बीड येथे दिनांक 31 जुलै 2023 सोमवार रोजी संध्याकाळी 07:00 वाजता एक शाम मुहम्मद रफी सहाब के नाम या कार्यक्रमाचे आयोजन सुप्रसिद्ध गायक एम.एम.शेख यांनी केले असून यात आकाश जाधव, मझहरुद्दीन, संध्या जाधव, निशा उजगरे या गायकांचा सहभाग राहणार आहे तर दीपक कांबळे हे व्यवस्थापन सांभाळणार आहेत.
गायक एम.एम.शेख हे गेल्या काही वर्षांपासून मुहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने एक शाम मुहम्मद रफी सहाब के नाम हा कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमातून रफी साहेबांना श्रद्धा सुमन अर्पित करण्यात येते तसेच जवळपास प्रत्येक भाषेत गीत गाऊन जगविख्यात झालेले अजरामर गायक मुहम्मद रफी यांच्या गीतांची मेजवानी अनेक गायक कलाकारांना एकत्रित आणून गीत संगीत रसिकांसमोर सादर केली जातात. यावेळी सुद्धा मुहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे एक शाम मुहम्मद रफी के नाम हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावेळीही आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रफी साहेबांच्या गीतांचा आनंद घ्यावा. कार्यक्रमात प्रवेश विनामूल्य आहे. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक एम.एम.शेख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

COMMENTS