Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार लाख वीस हजारांचे अठरा मोबाईल नागरिकांना केले परत

तोफखाना पोलिसांची कामगिरी

अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. तोफखाना पोलिसां

शहीद दिनाच्या निमित्ताने सद्भावना पदयात्रेचे आयोजन
विवाहितेचा छळ करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
राहाता शहरांमध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांचे ठिकठिकाणी श्रमदान

अहमदनगर : तोफखाना पोलिसांनी चोरीला गेलेले व हरवलेले चार लाख वीस हजार रुपये किमतीचे वीस महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. तोफखाना पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरीला गेलेले व हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी मूळ तक्रारदारांना मोबाईल परत केले आहेत.

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे  यांना सूचना द्दिले  होते त्यानुसार पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी  पोलिस अंमलदाराना यांना सूचना  दिल्या होत्या. त्यानुसार मोबाईल चोरीच्या दाखल गुन्ह्यांचा तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास करून चोरीतील तब्बल चार लाख वीस हजार रुपये किमतीचे अठरा महागडे मोबाईल हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. चोरीतील मोबाईल परत मिळाल्यावर तोफखाना पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तक्रारदारांना  पोलीस ठाण्यात बोलावून मोबाईल परत केले. 

चोरीतील विवो, रेडमी, ओप्पो, सॅमसंग तसेच आयफोन कंपनीचे मोबाईल फोन परत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यातील काही तक्रारदारांनी गेलेला मोबाईल परत मिळेल, ही आशाही सोडून दिली होती. मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांनी तोफखाना पोलिसांचे आभार व्यक्त केले.

पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलिस उप निरीक्षक सचिन रनशेवरे , पोलिस हवालदार संतोष गर्जे, पोलिस हवालदार सुनील शिरसाठ, पोलिस नाईक भानुदास खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल सुमित गवळी, पोलिस नाईक सलीम शेख पोलिस कॉन्स्टेबल राहुल म्हस्के तसेच दक्षिण मोबाईल सेलचे पोलिस कॉन्स्टेबल शिंदे यांनी कारवाई केली.

COMMENTS