Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक

धडक देणारा अज्ञात फरार; तनिष गंभीर जखमी

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील तनिष तुषार कापसे या आठ वर्षीय बालकास जुना टाकळी रोड काका कोयटे यांच्या बंगल्याच्या जवळच्या कंपाउंड जवळच्या

मेव्हण्याच्या लग्नासाठी पुण्याहून नांदेडला निघालेल्या संगणक अभियंता आशिष वैद्य यांच्या कारला अपघात 
मोठा अपघात ! विमानाच्या चाकाखाली आली कार अन्….
टेम्पो आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक; रस्त्यावर दारुच्या बाटल्यांचा खच

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहरातील तनिष तुषार कापसे या आठ वर्षीय बालकास जुना टाकळी रोड काका कोयटे यांच्या बंगल्याच्या जवळच्या कंपाउंड जवळच्या रोडला एका अनोळखी दुचाकी स्वराने जोराची धडक देत तिथून पळून गेल्याची घटना नुकतीच कोपरगाव शहरात घडली असून जखमी तनिष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
सविस्तर वृत्त असे की, आत्मा मालिक गुरुकुल येवला येथे नोकरीस असलेले तुषार रमेश कापसे यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझा 8 वर्षीय तनिष हा मुलगा बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास दुकानात पायी जात असताना त्यास शहरातील जुना टाकळी रोड काका कोयटे यांच्या बंगल्याच्या कंपाउंड जवळ एका अनोळखी होंडा कंपनीच्या युनिकॉन एम एच 38- 6686 या भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकी स्वराने जोराची धडक देत तिथून  तो दुचाकी स्वार फरार झाला आहे. या अपघातात 8 वर्षे तनिष ला मोठी दुखापत झाली असून अपघात होताच त्याच्या कुटुंबांनी तात्काळ जवळ असलेल्या डॉ. कृष्णा फुलसुंदर यांच्याकडे उपचारासाठी नेले असता त्यांनी सांगितले की मुलाच्या पोटरीचे दोन्ही हाडं तुटले असून तुम्ही  त्याला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यानुसार आम्ही त्याला शहरातील डॉ. योगेश कोठारी यांच्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल केले असल्याच्या माहितीवरून कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी दुचाकी स्वराविरुद्ध  भारतीय दंड संहिता 1860 नुसार 279,337,338 तर 1988 नुसार 184,134 (अ), 134 (ब) व 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दिलीप तिकोणे हे करत आहे.

माझ्या निष्पाप कोवळ्या जीवाला भरधाव जाणार्‍या त्या अनोळखी दुचाकी वल्याने जबर धडक देत जखमी केले परंतु त्यांने माणुसकी या नात्याने माझ्या मुलाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन जाणे अपेक्षित होते परंतु त्याने तसे न करता तेथून पळ काढला आहे त्यामुळे पोलिसांनी सदर दुचाकी स्वरास तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी.
 तुषार कापसे (जखमी तनिषचे वडील)

COMMENTS