चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने येथील औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपासजवळ सापळा लावून एकास पकडले. त्याच्याकडून चार गावठ

Ahmednagar : नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीचा विवाह (Video)
चाळीस हजारांची लाच घेतांना महिला सरपंचासह पतीस अटक
संजीवनीच्या विद्यार्थ्यांची लायन्स मूकबधिर विद्यालयास भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने येथील औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपासजवळ सापळा लावून एकास पकडले. त्याच्याकडून चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यात अग्नीशस्त्र व हत्यारांबाबत कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना विशेष आदेश दिले आहेत. त्यानुसार कटके यांनी गावठी कट्टे व अन्य शस्त्रे पकडण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. नगरला एकजण गावठी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक कटके यांनी अधिक माहिती घेऊन गावठी कट्टे व जिवंत काडतूस विक्री करण्यासाठी औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणार्‍यास नगर तालुक्यातील शेंडी बायपास-पांढरीपूल या ठिकाणी सापळा लावला होता.

ट्रकमुळे थांबला व पकडला
पोलिसांनी सापळा लावल्यावर संशयावरून काळया रंगाच्या मोटारसायकलवर औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणार्‍यास हात दाखवून थांबण्यास सांगितले. परंतु पोलिसांना पाहून त्याने मोटारसायकल जोराने चालवून तो शिर्डी बायपास रोडने पळून जाऊ लागला. पण समोरून आलेल्या ट्रकमुळे त्याच्या मोटारसायकलचा स्पीड कमी झाल्याने त्यास पाठलाग करणार्‍या पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याचे नाव महेश काशिनाथ काळे (वय 26 वर्ष, रा. जामगाव, तालुका गंगापूर, जिल्हा औरंगाबाद) असे आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 4 गावठी बनावटीचे कट्टे व 8 जिवंत काडतुसे असे विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या सापडली. या प्रकरणी पोलिस हवालदार संदीप पवार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे, पोलिस हवालदार संदीप पवार, सुनील चव्हाण, मनोज गोसावी, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक शंकर चौधरी, रवि सोनटक्के, ज्ञानेश्‍वर शिंदे, कॉन्स्टेबल आकाश काळे, मेघराज कोल्हे व चालक पोलिस हवालदार संभाजी कोतकर यांनी केली आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस स्टेशन करीत आहे.

सराईत गुन्हेगार
महेश काशीनाथ काळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यात दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे, वाळू चोरी व अवैध अग्नीशस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत.

COMMENTS