Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कळस बुद्रुक शाळेचे आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती यादीत चमकले

अकोले ः राज्य शिक्षण परिषदेमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक तालुक

आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
सोशल मीडियावर मेसेजद्वारे पाठलाग, दोघांवर गुन्हा दाखल
नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

अकोले ः राज्य शिक्षण परिषदेमार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळस बुद्रुक तालुका अकोले या शाळेचे तब्बल आठ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले असून 28 विद्यार्थी उत्कृष्ट मार्काने उत्तीर्ण झाले आहे . कळस बुद्रुक शाळेने आपली यशाची परंपरा कायम राखत यावर्षी उत्तुंग यश संपादन केले आहे.  
शाळेचे विद्यार्थी वेदिका विवेक वाकचौरे, ज्ञानदा प्रशांत वाकचौरे, अरुंधती सुहास कातोरे, गौरी विष्णू वाकचौरे, पूर्वा विकास वाकचौरे, विराज जयराम वाकचौरे, यश योगेश वाकचौरे, ईश्‍वरी प्रशांत हुजबंद हे विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहे.                                 सदर विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका सुवर्णा जाधव (मोहिते) तसेच सभाजी दातीर, संपत भोर, यांच्यासह मुख्याध्यापिका संगीता दिघे, स्वप्ना गुरव, माधवी गोरे, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब चौधरी, योगेश थोरात, पुष्पा सूर्यवंशी, वृषाली बर्वे, हर्षल सोनवणे, यासिर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले. लोक सहभागातून आज शाळेत सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहे. शिक्षकांचे विशेष परिश्रम व ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे आज खाजगी शाळांच्या तुलनेत ही शाळा जिल्ह्यात सर्व बाबतीत अव्वल आहे. केवळ बौद्धिक बाबीकडे लक्ष न देता स्पर्धात्मक, सांस्कृतिक, क्रीडा आदि सर्व क्षेत्रात सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविण्याकडे शालेय व्यवस्थान समितीचा विशेष कल आहे. सदर शिक्षकांचे अध्यापनातील सातत्य व शाळेसाठी जादा वेळ देण्याची मानसिकता यामुळे हे यश साध्य झाल्याचे व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानदेव निसाळ यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थांचे जि प. बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, गटशिक्षणाधिकारी अभय वाव्हळ, विस्तार अधिकारी माधव हासे, केंद्रप्रमुख शकील बागवान, सरंपच राजेंद्र गवांदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू वाकचौरे, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS